बातम्या

प्रतीक्षा संपली! उद्या दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता होणार जाहीर

The wait is over 10th class result will be announced tomorrow at 1 pm


By nisha patil - 1/6/2023 6:51:55 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम दहावीच्या निकालाची धाकधूक असणाऱ्या सर्व विद्यार्थी पालकांसाठी उद्याचा दिवस महत्वाचा असणार आहे. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहवीच्या परीक्षेचा निकाल उद्या, म्हणजेच  2 जून 2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. उद्या दुपारी एक वाजता हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे,  यंदा निकालाची प्रत डाऊनलोड करण्याचा ऑप्शन देखील बऱ्याच साईटवर देण्यात आला आहे.
बोर्डाने निकाल जाहीर केल्यानंतर,   निकालाची वाट विद्यार्थी उत्सुकतेने पाहत आहेत. निकालाची पत्रकार परिषद सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आलीय उद्या दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत होत आहे. यंदा 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 ने कमी झाली आहे.


प्रतीक्षा संपली! उद्या दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता होणार जाहीर