बातम्या
लग्नसराईच्या सीझनला सुरुवात...
By nisha patil - 11/30/2023 5:01:20 PM
Share This News:
लग्नसराईच्या सीझनला सुरुवात...
वेडिंग फिल्मसह वेडिंग रील्स तयार करून घेण्याला जोडप्यांची पसंती...
छायाचित्रकार-व्हिडीओग्राफर्सकडे वेडिंग रील्सला सर्वाधिक मागणी
यंदा लग्नाच्या रेशीमगाठीत अडकणाऱ्या जोडप्यांमध्येही रील्सची क्रेझ वाढली आहे. या वर्षी वेडिंग फिल्मसह वेडिंग रील्स तयार करून घेण्याला जोडप्यांची पसंती देत असून, प्री-वेडिंग शूट करून घेण्यापेक्षा छायाचित्रकार-व्हिडीओग्राफर्सकडे वेडिंग रील्सला सर्वाधिक मागणी होत आहे. छायाचित्रकार - व्हिडीओग्राफर्सही लग्नांमध्येच विविध गाण्यांवर रील्स शूट देत असून, ते सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
सोमवारपासून लग्नसराईच्या सीझनला सुरुवात झाली आहे. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रवारीमध्ये लग्नाचे अनेक मुहूर्त आहेत आणि त्यामुळेच छायाचित्रकार-व्हिडीओग्राफर्सकडे लग्नाच्या शूटसाठी मागणी वाढली आहे. फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर राजस्थान, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश येथूनही लग्नाच्या शूटची कामे छायाचित्रकार-व्हिडीओग्राफर्सला मिळाली आहेत. संपूर्ण टीम कामाला लागली आहे. विविध गाण्यांवर, धीमनुसार लग्नामध्येच हे सहा ते सात रील्स शूट करून दिले जात आहेत.
लग्नातील क्षण रील्समध्ये दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुणे फोटोग्राफर्स आणि व्हिडीओग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष अभय काप्रे म्हणाले की, सध्या लग्नसराईचा सीझन सुरू झाल्यामुळे छायाचित्रकार-व्हिडीओग्राफर्सकडे लग्नाच्या शूटसाठी विचारणा सुरू झाली आहे. काहींच्या फेब्रुवारीपर्यंत च्या तारखाही बुक झाल्या आहेत. लग्नामध्येच थोडा वेळ काढून वेगवेगळ्या थीमप्रमाणे हे रील्स शूट केले जात आहेत, त्याला विविध गाण्यांची जोड देऊन आणि एडिटिंग करून हे रील्स जोडप्यांना तयार करून दिले जात आहेत. हे रिल्स फेसबुक, इन्स्टाग्राम, यु-ट्यूब चॅनेलवर अपलोड होत आहेत.
लग्नसराईच्या सीझनला सुरुवात...
|