बातम्या

"शिरढोण-नांदणी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे कामाच्या चौकशीची मागणी

The work of Shirdhon Nandani road is of poor quality  Demand for work inquiry


By nisha patil - 12/28/2023 10:34:22 PM
Share This News:



"शिरढोण-नांदणी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
 कामाच्या चौकशीची मागणी
 

शिरढोण(संजय गायकवाड)/ता.२८ नांदणी ते शिरढोण (ता.शिरोळ) या रस्त्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकार यांच्या फंडातून  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने  डांबरीकरण व मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात आले. खडीकरण व डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून निकृष्ट कामामुळे रस्ता उखडला जात आहे.या संपूर्ण कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थातून करण्यात येत आहे.
     

शिरढोण नांदणी या रस्त्याच्या मजबुतीकरण कामात जाणीवपूर्वक मापात पाप केले जात असल्याच्या भावना नागरिकांच्या आहेत.  या रस्त्याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्यानंतर शिरढोण ग्रामपंचायतीने डिसेंबर महिन्यात  सार्वजनिक बांधकाम विभाग जयसिंगपूर यांच्याकडे सदरच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत पत्र देऊनही बांधकाम विभागाचे अधिकारी जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत आहेत या रस्त्याला टक्केवारीचे ग्रहण लागले असल्याचा आरोप नागरिकांतून करण्यात येतं आहे 
   

  ऊस हंगाम चालू असल्याने वाहनांमुळे हा रस्ता उखडला जात असल्याचा ठेकेदाराचा अंदाज फेल असून मजबुती करण व्यवस्थित झाले नसल्याने हा रस्ता उखडला जात असल्याचे दिसत आहे. या रस्त्याच्या कामाकडे शिरढोण गावातील नेत्यांचे देखील दुर्लक्ष झाले असून जनतेच्या पैशातून अशा प्रकारचे रस्ते होत असताना गाव पुढारी जर गप्प बसत असतील या सारखी वाईट शोकांतिका कोणती नाही
        

दरम्यान उखडलेल्या रस्त्यामुळे  वाहन चालकांला आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.यामुळे रस्त्यावर अपघात घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बांधकाम विभाग रस्त्याचे काम करीत आहे की, लोकांच्या मरणाची व्यवस्था, करीत आहे असा प्रश्न प्रवासी वर्गातून विचारला जात आहे.नांदणी ते शिरढोण रस्ता वाहतुकदारांसाठी मृत्यूमार्ग ठरू पाहत आहे. एकीकडे रस्त्याचे डांबरीकरणाचे काम होत असतानाच दुसरीकडे अल्पावधीत रस्त्याचे बेहाल होत आहेत. रस्ता करताना डांबराचे प्रमाण कमी वापरल्याने जागोजागी रस्ता उघडला आहे
     शासन कोट्यवधी रुपये रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरण कामावर खर्च करत असताना रस्ते वर्षभर नाही तर सहा महिनेही  टिकाव धरतील की नाहीं अशी शंका व्यक्त केली जात आहे , सदरच्या कामाची चौकशी होणे आवश्यक आहे. जयसिंगपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने नांदणी ते शिरढोण रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरु करण्यात आले असले तरी. निकृष्ट कामाचे पाप लपविण्याचा प्रयत्न कंत्राटदाराकडून होत असताना बांधकाम विभागाचे अधिकारी या गैरप्रकाराकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. या रस्त्याच्या कामाची चौकशी होणे तर आवश्यक आहेच त्याबरोबर या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्याची देखील चौकशी होणे आवश्यक आहे


"शिरढोण-नांदणी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे कामाच्या चौकशीची मागणी