ग्रामीण

चांदणी चौक परिसरातील काँक्रिटीकरण रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या हस्ते

The work of concreting roads in Chandni Chowk area was started

By nisha patil - 1/17/2025 2:08:58 PM
Share This News:

चांदणी चौक परिसरातील काँक्रिटीकरण रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या हस्ते

चांदणी चौक परिसरातील विठ्ठल मंदिर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे साहेब यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

यावेळी प्रमुख मान्यवरांनी या कामाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला आणि गावाच्या विकासासाठी अशा प्रकल्पांचा महत्त्वपूर्ण ठरल्याचे सांगितले. आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे साहेब म्हणाले, "रस्ते, पायाभूत सुविधा आणि विकासकामे हे ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनमान उंचावण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. हा प्रकल्प चांदणी चौक परिसरातील ग्रामस्थांना आधुनिक व सुगम प्रवासाची सुविधा देईल."

कार्यकमात सरपंच पल्लवी पोवार, नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे, उप सरपंच मृत्युंजय पाटील, माजी सरपंच यशवंत वाणी, भाजपाचे अध्यक्ष भीमराव बन्नै, के जी पाटील, प्रवीण पाटील, विजय चौगुले, सचिन चौगुले, योगेश वाणी, अमित खोत, विनायक देसाई, शुभम नलवडे, शिवभूषण विभुते, सुरेश पोवार आणि गोगा बाणदार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

चांदणी चौक परिसरातील काँक्रिटीकरण रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या हस्ते
Total Views: 51