बातम्या
सांगलीतील गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरुवातीपासूनच वादग्रस्त....
By nisha patil - 6/18/2024 2:08:12 PM
Share This News:
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये गेल्या तीन वर्षापासून गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम चालू आहे सदर काम सुरुवातीपासून वादग्रस्त राहिलेले आहे कारण त्या रस्त्याच्या नुकसान भरपाई साठी भरले जाणारे पैसे ह्या तपावत आहेत या तक्रारी झाल्या मात्र काही सुद्धा कारवाई झाली नाही .
त्याच पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी त्यांनी काम केलेला आहे त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईन फोडलेले आहेत आणि तसेच टाकून गेलेले आहेत त्याचा सर्व बुरदंड मनपावर पडलेला आहे सदर गॅस पाईपलाईनच्या कॉन्टॅक्ट वर कोणत्याही पद्धतीची कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे ते बिनधास्त पणे अशा पद्धतीने पाण्याच्या पाईपलाईन फोडत निघालेले आहेत आत्ता लिंगायत बोर्डिंग समोर किमान 15 ते 20 ठिकाणी त्यांनी मेन पाईपलाईन फोडलेली आहे चेंबरला पाणी येत असं मोठ्या प्रमाणात पाणी लिकेज होत आहे सदर ठिकाणी पाहणी केली असता लाखो लिटर पाणी वाया जात आहे
जणू काही महापूराची जी परिस्थिती त्या भागात होते तशीच परिस्थिती आता दिसत आहे लोकांना घरातून आत बाहेर करता येत नाही तसेच पाणीपुरवठा अधिकारी सुनील पाटील साहेब जागेवर आले असता त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर असे निदर्शनास येते सांगली शहर पूर्ण ह्या लिकेज पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात खंडित होणार आहे तसेच सदर काम तात्काळ होण्याबाबत सुद्धा शंका आहेत ह्या माध्यमातून आयुक्त साहेबांना विनंती आहे संबंधित गॅस कॉन्टॅक्ट त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्यात यावी तसेच त्यांनी आतापर्यंत जिथे जिथे अशा पद्धतीने पाईपलाईन फोडलेले आहेत त्याची सर्व नुकसान भरपाई त्यांच्याकडे वसूल करण्यात यावी आणि काय तर नियमावली घालून घेऊन काम करून घेण्यात यावे अशी विनंती नागरिक जागृती म्हणजे सांगली जिल्हा यांच्या वतीने सतीश साखळकर यांनी दिली आहे.
सांगलीतील गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरुवातीपासूनच वादग्रस्त....
|