बातम्या

शाहू कारखान्याच्या वतीने घेण्यात आलेल्या कुस्तीने सर्वांची मने जिंकली...

The wrestling held on behalf of Shahu Factory won everyones hearts


By nisha patil - 8/20/2024 9:34:35 PM
Share This News:



कागल : शाहू साखर कारखान्यामार्फत शाहू जयंतीनिमित्त घेण्यात आलेले मॕटवरील कुस्ती स्पर्धेत, 85 किलो सीनियर गटात प्रशांत आनंदा मांगोरे पिंपळगाव बुद्रुक याने  तर   महिलांच्या 76 किलो वजन गटात शाहू साखरची मल्ल सायली दंडवते हिने प्रथम क्रमांक पटकाविला.

शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे  यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेची सुरूवात केली आहे. त्यांच्या पश्चात शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह  घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंडितपणे चालू आहेत.  कुस्ती शौकिनांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात  16 ते 19 ऑगस्ट अखेर या स्पर्धा संपन्न झाल्या.

 प्रथम क्रमांकासाठीची लढत शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे हिंदकेसरी दीनानाथ सिंह,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण,
यांच्या हस्ते लावण्यात आली. तर विजेत्यांना राजे समरजितसिंह घाटगे हस्ते बक्षीस वितरण  करण्यात आले. 

85 किलो वजन गटात एकोंडीच्या  विवेक चौगुले यांनी आणि दुसरा तर स्वप्निल शेंडे व  आनुर च्या सुदेश नरके  यांनी तिसरा क्रमांक पटकावला. महिलांच्या 76 किलो वजन गटात शाहू साखर च्या सुकन्या मिठारी हिने दुसरा तर गायत्री ताटे हिने तिसरा क्रमांक पटकावला.स्पर्धेतील सर्व  विजेत्याना कुस्ती समाप्त होताच अलॉम्पिक  च्या धरतीवर बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी पै. रामा माने यांच्यासह अनेक कुस्तीपटू व कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने हजर होते.


शाहू कारखान्याच्या वतीने घेण्यात आलेल्या कुस्तीने सर्वांची मने जिंकली...