बातम्या

अश्लील मेसेज करून तरुणीला धमकी पोलिसांनी घेतलं ताब्यात...

The young woman was threatened with obscene messages and taken into custody by the police


By nisha patil - 4/17/2024 12:58:47 PM
Share This News:



कोल्हापूर शहरात राहणारी पीडित तरुणी आणि अमरनाथ दप्तरदार हे दोघे एकाच शहरातील महाविद्यालयात शिक्षण घेतात. अमरनाथ याने पीडित तरुणीच्या इन्स्टा अकाउंट वरती  अश्लील मेसेज केले.यावर तरुणीने नातेवाईकांकडे तक्रार करून त्याची समजूत काढण्याचा देखील  प्रयत्न केला तरी देखील अमरनाथ हा वारंवार पीडित तरुणीला इन्स्टा आकॉटवरून अश्लील मेसेज पाठवून बदनामी करत होता. तसेच तुझे नग्न फोटो पाठव नाहीतर तुला ठार मारेन अशी  धमकी देखील देत होता. अखेर या तरुणीने या त्रासाला कंटाळून शाहूपुरी पोलीस ठाण्यातील निर्भया पथकाच्या मदतीन फोन करून त्याला नागळा पार्क परिसरातील एका कोल्ड्रिंक हाऊस मध्ये बोलवून घेतले.यानंतर शाहूपुरी पोलिसांनी त्याला सापळा रचून अमरनाथ दप्तरदार याला ताब्यात घेतल. ही कारवाई शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक अजय सिदकर तानाजी चौगुले निर्भया पथकातील नंदा सुतार मनीषा गुरव स्मिता जाधव शिवसेन पाटील सायबर शाखेचे सागर माळावे संगीता खोत दिलीप पवार यांनी मिळून केलीय.  दरम्यान आरोपी अमरनाथ दप्तरदार  याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय 


अश्लील मेसेज करून तरुणीला धमकी पोलिसांनी घेतलं ताब्यात...