बातम्या
धक्कादायक : युवकाला न्यायालयाच्या पायऱ्यांवरच मृत्यू...
By nisha patil - 1/29/2024 6:27:54 PM
Share This News:
कोल्हापूर – आज कोल्हापूर जिल्हा न्यायालयाच्या पायऱ्यांवर धक्कादायक घटना घडलीय. सुनावणीसाठी आलेल्या बेंगळुरूच्या युवकांला न्यायालयाच्या पायऱ्यांवरच हृदय विकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झालाय.
बेंगळुरू येथील विवेक चलाणी याचा कौंटुंबिक वादाचा खटला जिल्हा न्यायालयातील प्रथमवर्ग न्याय दंडाधिका-यांसमोर गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. नेहमीप्रमाणे तो आज (सोमवारी) सुनावणीसाठी न्यायालयाच्या आवारात पोहोचला. यावेळी पाय-या चढताना चक्कर आल्याने तो खाली कोसळला. पोलिसांनी त्याला तातडीने सीपीआरमध्ये दाखल केलं असता डॉक्टरांनी, उपचारापूर्वीचं त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केलं.
धक्कादायक : युवकाला न्यायालयाच्या पायऱ्यांवरच मृत्यू...
|