राजकीय

...तर जनता दरबारात मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार : राजू शेट्टी

Then the people will ask the Chief Minister to answer in the Durbar Raju Shetty


By Administrator - 12/6/2023 12:56:19 PM
Share This News:



...तर जनता दरबारात मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार : राजू शेट्टी

 ऊस दर नियंत्रण समितीच्या स्थापनेसह शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानावर राज्य सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी जनता दरबारातच मुख्यमंत्र्यांना जाब विचारतील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. यावेळी या संदर्भात कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले की, राज्य सरकारने ऊस दर नियंत्रण समिती न नेमल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. राज्य सरकारला आम्ही गेल्या वर्षभरापासून या संदर्भात वेळोवेळी ऊस दर नियंत्रण समितीची स्थापना करण्यासाठी मागणी केलेली आहे.
ऊस दर समिती स्थापन न झाल्यामुळे राज्यातील बहुसंख्य साखर कारखान्यांनी अद्याप उसाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना दिलेला नाही. शेतकऱ्यांचे हजारो कोटी रूपये साखर कारखानदार बिनव्याजी वापरत आहेत. तसेच राज्य सरकारने गेल्या १४ महिन्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम अद्यापही दिलेली नाही. आम्ही या संदर्भात मा. मुख्यमंत्री महोदयाकडे वेळोवेळी मागणी केली आहे. तातडीने प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देणेसंदर्भात आदेश व्हावेत. ही देखील आमची आग्रही मागणी आहे. 
११ जून रोजी कोल्हापूर जिल्ह्यात जनता दरबार घेत आहेत. आमच्या मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास मुख्यमंत्री महोदयांच्या जनता दरबारात हजार शेतकऱ्यांच्या साक्षीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही जाब विचारू, शेतकऱ्यांच्या साठी सरकारने काय केले आहे. या संदर्भात शासनाने तातडीने खुलासा करावा. मुख्यमंत्र्यांच्या दौर्या अगोदर प्रश्न मिटला नाही. तर स्वाभिमानी स्टाईलने आंदोलन करू असा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिला. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंधर पाटील, जनार्दन पाटील, सागर संभूशेटे उपस्थित होते.


...Then the people will ask the Chief Minister to answer in the Durbar: Raju Shetty