बातम्या

रिकाम्या पोटी खजूर खाण्याचे होतात अनेक फायदे, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितली खास पद्धत.....

There are many benefits of eating dates on an empty stomach


By nisha patil - 3/26/2024 9:37:23 AM
Share This News:



ड्राय फ्रुट्समधील एक महत्वाचं फळ म्हणजे खजूर. खजूर खाण्याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. आयुर्वेदनुसार खजूर थंड असतं आणि पित्ताची समस्या दूर करण्यासाठी याने खूप फायदा मिळतो. सोबत शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात. पण ते खाण्याची योग्य पद्धती अनेकांना माहीत नसते. 

खजूरामध्ये फयबर, आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन आणि मॅग्नेशिअम भरपूर असतात. तसेच यात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी सारखे पोषक तत्व असतात. यात अॅंटी-ऑक्सिडेंटही असतात. त्याशिवाय यात पोटॅशिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम सारखे पोषक तत्व असतात.

आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांच्यानुसार, जर तुम्हाला खजूराकडून जास्त फायदा मिळवायचा असेल तर तुम्ही ते भिजवून खाल्ले पाहिजे. चला जाणून घेऊ फायदे...

भिजवलेले खजूर खाण्याचे फायदे...
*बद्धकोष्ठता दूर होते.
*हृदयासाठी चांगले.
*कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत.
*हाडे मजबूत होतात.
*ब्लड प्रेशर कंट्रोल.
*मेंदुसाठी फायदेशीर.
*कमजोरी दूर होते.
*रक्ताची कमतरता दूर होते.
*सूज कमी करतात.
*त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर.

रिकाम्या पोटी खजूर खाण्याचे फायदे...

1) वजन होईल कमी...
सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने तुमचं वाढलेलं वजन कमी होतं. अशात ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी झोपेतून उठल्यावर खजूर खावे. याने बराच वेळ पोट भरलेलं राहतं. अशात तुम्ही अनावश्यक खाणं टाळू शकता.

2) वाढेल एनर्जी...
जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल तर शरीरात दिवसभर एनर्जी कायम राहते. यात आयरन भरपूर असतं. ज्यामुळे शरीरात हीमोग्लोबिनची लेव्हल वाढते. तसेच तुमच्या भरपूर एनर्जी राहते.

3) डायजेशन होईल मजबूत...
ज्या लोकांना नेहमीच पोटात गडबड असते, त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी खजूर खावे. यातील फायबरमुळे डायजेशन आणि पोट साफ होण्याची प्रक्रिया सोपी होते. ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या दूर होते.

एका दिवसात किती खजूर खावे...?
डॉक्टरांनी सांगितलं की, सगळ्या वयातील लोकांनी दिवसातून 2 खजूर खाण्यास सुरूवात करावी. वजन वाढवणाऱ्यांनी रोज 4 खजूर खावेत.

खजूर भिजवून का खावेत...?
भिजवल्याने खजूरातील टॅनिन आणि फायटिक अॅसिड निघून जातं. ज्यामुळे पोषक तत्व सहजपणे अवशोषित करण्यास मदत मिळते. भिजवलेले खजूर लवकर पचतात. जर तुम्हाला खजूराचे जास्त फायदे हवे असतील तर ते रात्री 8 ते 10 तास भिजवून ठेवा 


रिकाम्या पोटी खजूर खाण्याचे होतात अनेक फायदे, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितली खास पद्धत.....