बातम्या

लाखो वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 2 जूनपासून ...

There is good news for millions of workers


By nisha patil - 5/18/2024 10:17:00 PM
Share This News:



विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे प्रमुख गहिनीनाथ औसेकर  गेल्या अनेक दिवसांपासून मंदिराच्या गाभाऱ्याचे काम सुरु होते. त्यामुळं विठ्ठलाचे चरणस्पर्श दर्शन बंद होते. आता पुन्हा पूर्ववत दर्शन सुरु होणार आहे. गेल्या 15  मार्चपासून विठ्ठल रुक्मिणीचे  चरण स्पर्श दर्शन बंद होते. कारण मंदिराच्या संवर्धनाचे काम सुरु आहे. हे काम पुढेही 17-18 महिने हे काम सुरु राहणार आहे. पण मंदिराच्या गर्भगृहाचे व चार खांबाचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. त्यामुळं येत्या 2 जूनपासून विठ्ठल मंदिर पूर्ववत पदस्पर्शाने सुरु करण्यात येणार असल्याची गहिनीनाथ औसेकर यांनी दिली आहे. 2 जूनपासून 9 जूनपर्यंत ज्या राहिलेल्या कुटी पुजा आहेत, त्या सर्व देवाच्या पुजा होणार आहेत. देवाची तुळशी आणि पाद्य पुजा पर्ववत सुरु होणार असल्याची माहिती औसेकर महाराजांनी दिली.


लाखो वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 2 जूनपासून ...