बातम्या
गजापूर लोकांमध्ये अद्यापही दहशत
By nisha patil - 7/17/2024 2:53:39 PM
Share This News:
विशाळगड वरील अतिक्रमण रोखण्यासाठी संभाजी राजे तसेच विविध संघटनांच्या वतीने आंदोलन पुकारले गेले होते.तत्पूर्वी बेकायदेशीर अतिक्रमणे काढावीत असे इशाराही दिला होता.मात्र दीड वर्ष होऊनही अतिक्रमणे हटवली गेली नसल्याने रविवारी संभाजी राजे व विविध संघटनांच्या वतीने आंदोलन गडाच्या पायथ्याशी करण्यात आले .या आंदोलनात हजारो लोक सहभागी झाले होते.दरम्यान गडावर दगडफेक व तलवार हल्ल्याने वातावरण तापले.परिणामी पोलिसांना गड पायथ्याला लाठीचार्ज करावा लागला.आणि आंदोलकांनी हिंसक घेतले.
गजापुरातील रस्त्यालगतच्या मुसलमानवाडीला टारगेट करत घरांची, चार चाकी , टू व्हीलर वाहनांची तसेच येथील मशिदीवर हल्ला करून तोडफोड केली;तर काही घरांना आग लावली.यातून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
परिसरातील विशाळगड पायथा पांढरे पाणी,केंबुर्णेवाडी,गजापूरनाका आंबा येथील नाक्यावर सुमारें 200 पोलीसांचा कडक बंदोबस्त तैनात आहे. नागरीकांची कसून चौकशी केली जाते. यामुळें स्थानिकांना याचा फटका बसत आसल्याचे दिसून येते यामुळें परीसरातील लोकांमध्यें भितीचे वातावरण निर्माण झाले आहे
गजापूर लोकांमध्ये अद्यापही दहशत
|