बातम्या

इचलकरंजीसाठी सुळकूड पाणी योजना झालीच पाहिजे !

There must be a Sulkood water scheme for Ichalkaranji


By nisha patil - 8/21/2023 4:50:20 AM
Share This News:



इचलकरंजी : प्रतिनिधी  इचलकरंजी शहरासाठी अत्यंत गरजेची असणारी नियोजित सुळकूड पाणी योजना मंजूर होवूनसुध्दा या योजनेला कागल तालुक्यातील लोकांचा गैरसमजातून विरोध होत आहे.कोणत्याही परिस्थितीत ही पाणी योजना पूर्ण होवून या इचलकरंजी शहराला पाणी मिळालेच पाहिजे , यासाठी संपूर्ण शहरवासीयांच्यावतीने बुधवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी शहर बंद आणि भव्य  विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात अखिल भारतीय मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सामील होण्याचा निर्धार महासंघाच्या वतीने शहर कार्यालय येथे आयोजित बैठकीत करण्यात आला.

या बैठकीत नियोजित सुळकूड पाणी योजना शहरासाठी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईपर्यंत मराठा महासंघ शहरवासियांच्या सोबतीने लढत राहणार आहे , असा निर्धारही करण्यात आला. यावेळी मराठा महासंघाचे शहर अध्यक्ष संतोष सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अध्यक्ष अरविंद माने, जिल्हा युवक उपाध्यक्ष दीपक रावळ, शहर कार्याध्यक्ष वैभव खोंद्रे, युवक अध्यक्ष नितेश पाटील, उपाध्यक्ष अवधुत मुडशिंगीकर, उपाध्यक्ष उत्तम चौगुले,युवक उपाध्यक्ष सागर जाधव,युवक संघटक नितिन कटके, ज्येष्ठ सल्लागार नाना भोसले, शहर संघटक सुरेश कापसे, शाखाअध्यक्ष विनायक चौगुले , गणेश नेमिष्टे, खोत, क्रीडा प्रमुख महेश मुतालिक आदीसह मराठा महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


इचलकरंजीसाठी सुळकूड पाणी योजना झालीच पाहिजे !