बातम्या

आक्षेपार्ह पोस्टवरून साताऱ्यातील पुसेसावळी गावात मोठा राडा

There was a big uproar in Pusesawali village of Satara over the offensive post


By nisha patil - 11/9/2023 11:27:17 PM
Share This News:



एका व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात  दोन गटात तणाव निर्माण झालाय . रविवारी सायंकाळी हा प्रकार घडला . यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तातडीने मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आलाय .  पोलिसांनी तातडीने परिस्थिती आटोक्यात आणली आहे . दरम्यान या घटनेनंतर साताऱ्यात इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे. पुसेसावळी येथे एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. या पोस्टवरुन लोकांचा गैरसमज होऊन कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला होता. या ठिकाणी तात्काळ सातारा पोलीसांनी प्रतिसाद देऊन या ठिकाणची परिस्थिती आटोक्यात आणली. सध्या पुसेसावळी आणि परिसरात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिलेला नाही. या ठिकाणी शांतता आहे. तसेच आवश्यक त्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला असल्याची माहिती सातारा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.


आक्षेपार्ह पोस्टवरून साताऱ्यातील पुसेसावळी गावात मोठा राडा