बातम्या

थंडीत देखील 3 प्रकारचे ‘हे’ चविष्ट पराठे शरीरास ठेवतील एकदम ‘गरम’ अन् ‘तंदुरूस्त’

These 3 types of tasty parathas will keep the body very hot


By nisha patil - 1/18/2024 7:43:08 AM
Share This News:




थंडीच्या दिवसात गरम गरम पराठे मन खुश करतातच सोबत शरीराला उबदार करतात . पण जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल आणि प्रत्येक वेळी पराठे खाल्ल्यानंतर तुम्हाला पश्चाताप होत असेल तर तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल, तुम्ही पराठ्याच्या मदतीने तुमचे वजनही कमी करू शकता. हे 4 पराठे तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करून स्वतःचे वजन कमी करू शकता.सकाळी उठल्यावर नाष्ट्यासोबत चहा – कॉफी घेतल्याने मेटाबॉलिज्‍म रेट  कमी होतो आणि तुमचे वजन वाढू शकते. पण जर थोडा व्यायाम करून व्यवस्थित हेल्‍दी ब्रेकफास्‍ट केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. आम्ही काही हेल्‍दी पराठे तुम्हाला सुचवत आहोत, हे पराठे पोट तर फूल करतील सोबत शरीराला पोषकसुद्धा आहेत.

कांदा पराठा 
कांद्यामध्ये कोलेजनआणि व्हिटॅमिन सी  भरपूर प्रमाणात असते जे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करते. कांद्याचा पराठा (पालक पराठा) केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर एकूणच आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठीही खूप चांगला मानला जातो, त्यामुळे हिवाळ्यात तुम्ही कांदा पराठा खावा.

पालक पराठा (palak paratha)
पालकामध्ये व्हिटॅमिन बी , ई आणि के (vitamin B, E and K) आणि पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक असतात, जे निरोगी शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. याशिवाय यामध्ये भरपूर फायबर (fiber) असते ज्यामुळे तुमचे पोट तासनतास भरलेले राहते. यामध्‍ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी आहे आणि ते अनेक पोषक तत्वांनी भरलेले आहे. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील जास्त असतो ज्यामुळे तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही.

मेथी पराठा 
मेथीमधे फायबर असते जे पचनसंस्था सुधारण्यास आणि वजन कमी करण्यास खूप फायदेशीर आहे.
हे आपल्या त्वचेसोबतच केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास देखील मदत करते.
मेथीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटक शरीराला अनावश्यक हानिकारक पदार्थांपासून मुक्त होण्यास मदत करतात.
मेथीचे पराठे वजन कमी करण्यासही खूप मदत करतात.

बीटरूट पराठा 
बीटरूट व्हिटॅमिन बी  ने भरपूर असते सोबतच ह्यात असणारे कॉपर, झिंक, फॉस्फरस,
सोडियम सारखे मिनरल शरीरासाठी खूप फायदेशीर असतात . ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे.
उत्तम आहार आणि थोडीशी कसरत तुमचं वजन नक्की कमी शकतात.


थंडीत देखील 3 प्रकारचे ‘हे’ चविष्ट पराठे शरीरास ठेवतील एकदम ‘गरम’ अन् ‘तंदुरूस्त’