बातम्या
आजी-आजोबांच्या ताटात असावेत ‘हे’ ५ पोषकतत्व
By nisha patil - 10/9/2023 7:17:50 AM
Share This News:
१. आजी-आजोबांना खायला द्या प्रोटीन रिच फूड्स –
प्रोटीनयुक्त पदार्थ शरीरातील पेशींची दुरुस्ती करतात. संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी शरीराला प्रोटीनची गरज असते. प्रोटीनचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते. आजी-आजोबांच्या डाएटमध्ये सोया प्रॉडक्ट, नट्स, सीड्स, अंडी आणि सोयाबीनचा समावेश करा.
२. आजी-आजोबांच्या आहारात हेल्दी फॅट्सचा करा समावेश –
लोक ज्येष्ठांच्या डाएटमधून फॅट काढून टाकतात. पण हेल्दी फॅट्सचे सेवन केल्याने शरीरात एनर्जी राहते. एनर्जीसाठी त्यांना मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स द्या. स्वयंपाकासाठी ऑलिव्ह ऑईल वापरा. ज्येष्ठांनाा सॅच्युरेटेड फॅट्सपासून दूर ठेवावे, जे प्रोसेस्ड पदार्थांमध्ये आढळते. हेल्दी फॅट्सचे सेवन केल्याने अशक्तपणा जाणवणार नाही.
३. आजी-आजोबांना खायला द्या कॅल्शियम –
कॅल्शियमचे सेवन केल्याने ज्येष्ठांचे दात आणि हाडे लवकर कमकुवत होणार नाहीत. कॅल्शियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन डी वृद्धांसाठी आवश्यक आहे. बहुतेक वृद्धांना हृदयाच्या समस्या असतात, त्यावर मात करण्यासाठी त्यांना लो फॅट फूड द्या. आजी-आजोबांना लॅक्टोज इनटॉलरन्सची समस्या असल्यास, त्यांना प्लांट बेस्ड मिल्क द्या. जसे की – बदामाचे दूध आणि नारळाचे दूध.
४. आहारात फायबरचा समावेश करा –
आजी-आजोबांची इम्युनिटी मजबूत करण्यासाठी त्यांच्या आहारात फायबरचा समावेश करा.
ताजी फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर फायबर असते. याचे सेवन केल्याने ते रोगांपासून दूर राहतील.
हवामान बदलत असताना ते आजारी पडणार नाहीत. भाज्या आणि फळांमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स आणि कार्ब्स मुबलक असतात.
५. वृद्धांच्या आहारात आयर्नचा समावेश करा –
आजी-आजोबांच्या आरोग्यासाठी आयर्नचे सेवन आवश्यक आहे. जसजसे वय वाढते तसतसे शरीरातील रक्ताभिसरण बदलते. रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी राखण्यासाठी आयर्नचे सेवन आवश्यक आहे.
आयर्नच्या मदतीने हिमोग्लोबिन वाढते, आणि शरीराच्या पेशींपर्यंत ऑक्सिजन पोहोचतो. ड्रायफ्रूट्स, पालक, टोफू आणि भोपळ्याच्या बिया आयर्न समृद्ध स्रोत आहेत.
आजी-आजोबांच्या न्यूट्रिशनची अशी घ्या काळजी –
त्यांच्यासोबत जेवण घ्या. अनेकदा ते एकटेपणाला बळी पडतात, ज्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. त्यांच्यासोबत वेळ घालवा. चांगले शिजलेले आणि मऊ अन्न त्यांना द्या. त्यांच्या आहारात प्रोटीन, फळे, भाज्या, धान्ये, दुग्धजन्य पदार्थ आणि हेल्दी फॅट्सचा समावेश करा. ज्येष्ठांच्या हायड्रेशनची काळजी घ्या. त्यांना पुरेशा प्रमाणात पाणी, नारळ पाणी आणि इतर द्रवपदार्थ द्या.
आजी-आजोबांच्या ताटात असावेत ‘हे’ ५ पोषकतत्व
|