बातम्या
खास महिलांसाठी कॅल्शियमचे हे 5 स्रोत!
By nisha patil - 8/31/2023 7:43:05 AM
Share This News:
खसखस: खसखस मध्ये कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस असते. खसखसचा जर आहारात समावेश करून घेतला तर हाडांची ताकद वाढू शकते. खसखस मुळे पचन सुद्धा चांगलं होतं. महिलांनी तर याचा आहारात नक्की समावेश करावा.
फ्लॅक्स सीड्स: फ्लॅक्स सीड्सचं नाव तुम्ही कधी ऐकलं आहे का? यात कॅल्शियम आणि ओमेगा -3 असतं. फ्लॅक्स सीड्स हाडे मजबूत करतात आणि हृदयाचे आरोग्य राखतात. यात मोठ्या प्रमाणात फायबर असतं जे पचनास मदत करतं आणि हार्मोन्स बॅलन्स करतं.
बदाम: बदामामुळे हाडे मजबूत होतात. बदाम त्वचेसाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. बदाम निरोगी चरबी आणि अँटीऑक्सिडंट्स देतात. महिलांनी कॅल्शियम साठी बदामाचा आहारात समावेश करावा. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ई ने समृद्ध असणारे बदाम भिजवून खाल्लेले उत्तम!
चिया सीड्स! ओमेगा -3 फॅटी ॲसिड आणि फायबर या बियाण्यांमध्ये असतात. यामुळे हाडे चांगले राहतात. याचा आहारात समावेश केल्यास कॅल्शियम मिळते.
मेथीचे दाणे: मेथीच्या बियांमध्ये लोह आणि फायबर असते. मेथीच्या बिया खाण्याचे खूप फायदे आहेत. महिलांसाठी तर हे उत्तम आहे. यामुळे चांगले पचन होते, रक्त चांगले होते, मासिक पाळी नियमित येते. महिलांसाठी हे अतिशय फायदेशीर आहे.
खास महिलांसाठी कॅल्शियमचे हे 5 स्रोत!
|