बातम्या

हे 5 प्रकारचे डोसे, चवीसह आरोग्यासाठीही आहेत उत्तम!

These 5 types of dosas are delicious as well as healthy


By nisha patil - 3/11/2023 7:17:45 AM
Share This News:



पनीर चीज डोसा: तांदूळ आणि उडीद डाळ भिजवून हा डोसा हे पीठ तयार केले जाते. मग पनीर बटाटा भरून किसून डोशाच्या वर टाकले जाते. एका बाजूला शिजल्यानंतर डोसा फोल्ड करून प्लेटमध्ये ठेवून सर्व्ह केला जातो.साधा

पेपर डोसा: साधा पेपर डोसा हा नावाप्रमाणेच साधा असतो आणि पेपर सारखा असतो. एकदम कुरकुरीत, पातळ. हा डोसा सांभार आणि नारळाच्या चटणीसोबत चांगला लागतो. तुम्ही याचा नाश्त्यामध्ये समावेश करू शकता.

रवा डोसा: रवा डोश्याची चव बाकी डोश्यांपेक्षा वेगळी लागते. तळलेले बटाटे या डोश्यामध्ये टाकलेले असतात. दोन प्रकारची चटणीसोबत हा डोसा उत्तम लागतो. हा डोसा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो.सांगा सगळ्यात कॉमन डोसा कोणता?

मसाला डोसा! या डोश्यामध्ये कांदा आणि मसालेदार बटाटे असतात. हा डोसा खूप कुरकुरीत आणि चवीला चांगला असतो. एखाद्या अनोळखी हॉटेल मध्ये गेल्यावर हा ऑप्शन लोंकांना बेस्ट वाटतो.हा डोसा खूप लोकप्रिय आहे.

नीरा डोसा! कर्नाटकच्या तामिळनाडू मध्ये हा डोसा खूप प्रसिद्ध आहे. देशभरातील डोस्याची क्रेझ बघता अर्थातच हा डोसा आता सगळीकडेच मिळतो. हा डोसा खूप हलका असतो, ग्लूटेन फ्री असतो त्यामुळे पौष्टिक असतो. नीरा डोसा बनवण्यासाठी तेल लागत नाही.


हे 5 प्रकारचे डोसे, चवीसह आरोग्यासाठीही आहेत उत्तम!