बातम्या

मक्याचे कणीस खाण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे

These are the health benefits of eating corn kernels


By nisha patil - 7/27/2023 7:40:37 AM
Share This News:



पावसाळ्याच्या दिवसांत भाजलेले हरभरे, शेंगदाणे आणि मक्याचे कणीस इत्यादी प्रकारच्या खाद्यपदार्थांचा चांगलाच बाजार भरतो. पावसाळ्यात लोक ठिकाणी फिरायला जातात तेव्हा हे पदार्थ खात असतात.

अनेक ठिकाणी भुट्ट्याचे ठेले लागलेले दिसतात लोक त्या भुट्ट्याचे म्हणजेच भाजलेले गरमागरम मक्याच्या कणीस खाण्याचा आनंद घेताना दिसतात. मक्याचे कणीसाला बरेच जण उकडून देखील खातात. मक्याचे कणीस खाल्याने आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. हे मक्याचे कणीस बाजारात पावसाळ्यात जास्त प्रमाणात सहज उपलब्ध असतात.

लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकजण आपल्या आहारात मक्याच्या कणीसाचा समावेश करू शकतात. मक्याच्या कणीसमध्ये खनिजे, अँटिऑक्सिडेंट्स आणि जीवनसत्त्वे अ, बी, ई असतात. हे आरोग्याशी संबंधित बर्‍याच समस्यांवर मात करण्यास मदत करते.

मक्याचे कणीस खाण्याचे फायदे –

-मक्याचे कणीस जीवनसत्त्वे आणि पोटॅशियम समृद्ध असतात. हे व्हिटॅमिन ‘बी’चा चांगला स्रोत आहे, जो ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतो. याशिवाय हाडे आणि केसांनाही चांगले असते. यात व्हिटॅमिन ‘ए’ असते जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करते.

-पिवळा कॉर्न कॅरोटीनॉइड्स ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनचा एक चांगला स्रोत आहे, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहेत आणि मोतीबिंदू होऊ शकणारे लेन्सचे नुकसान टाळण्यास मदत करतात.

-रक्तातील साखर वाढवू शकते आणि जास्त प्रमाणात सेवन केल्यावर वजन कमी होऊ शकते.

-मण्याचं कणीस खाल्ल्यामुळे दात मजबूत होण्यास मदत होते.

-मक्यामध्ये पित्त आणि वात कमी करण्याचे गुणधर्म असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे उकळत्या पाण्यात हळद आणि मीठ घालून मक्याचे दाणी उकडून खाल्ल्यास त्याचाही शरीराला फायदा होतो.

-मक्यात असलेल्या फॉलिक अॅसिडमुळे कर्करोगाचा धोका कमी असतो.


मक्याचे कणीस खाण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे