बातम्या
होळी साजरी करण्यामागे ही आहेत कारणं
By nisha patil - 3/25/2024 7:22:37 AM
Share This News:
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी साजरी केली जाते. देशभरात होळी अगदी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. होळी साजरी करण्याची प्रत्येक राज्याची पद्धत ही वेगवेगळी असली तरी त्यामागील उद्देश्य हा एकच आहे. वाईट विचार, दृष्ट प्रवृत्ती यांचा नाश करण्यासाठी होलिका दहन केले जाते. होलिका दहनानंतर वातावरण शुद्ध होते असे म्हटले जाते. काहीजण ठिकाणी अंगाला शेण, चिखल लावून ही होळी साजरी केली जाते.
होळी हा सण अनेक नावांनी ओळखला जातो. महाराष्ट्रात याला ‘शिमगा’, ‘हुताशनी’ दक्षिणेत ‘कामदहन’, बंगालमध्ये ‘दौलयात्रा’, उत्तरेत याला ‘दोलायात्रा’ असे देखील म्हटले जाते. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी होळी या सणाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.
होळीला बोंब मारण्याचीदेखील परंपरा आहे. या मागेही शास्त्र दडलेले आहे. मनातील दृष्ट प्रवृत्ती शमवण्यासाठी ही बोंब मारली जाते. होळीच्या दिवशी पूर्वा फाल्गुनी नक्षत्र येते. या नक्षत्राची देवता भग आहे. या भगाच्या नावाने बोंब ठोकणे ही परंपरा आहे. बोंब मारणे हा देवतेचा सन्मानच समजावा.
होळी साजरी करण्यामागे ही आहेत कारणं
|