बातम्या

साखरेच्या अतिसेवनामुळे शरीरावर होतात हे दुष्परिणाम

These are the side effects of excess sugar consumption on the body


By nisha patil - 6/22/2023 8:26:16 AM
Share This News:



निरोगी राहण्यासाठी, आपण प्रथिने, जीवनसत्त्वे, कार्ब्स, चरबी आणि खनिजे यांसारख्या सर्व पोषक घटकांचे  सेवन करणे महत्त्वाचे आहे.

मात्र, आपल्या रोजच्या जेवणात अशा काही गोष्टी असतात, ज्याचा शरीराला फायदा होत नाही, तरीही आपण त्यांचे सेवन करतो. त्यापैकी एक पदार्थ म्हणजे
साखर
. साखर खाल्ल्याने  आपल्या शरीराला फायदा होत नाही. जास्त गोड किंवा साखरेचे अतिसेवन  केल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते. ज्यामध्ये वजन वाढणे, मधुमेह, दात किडणे आणि उच्च रक्तदाब यांचा समावेश होतो. म्हणजेच निरोगी शरीर हवे असेल तर त्यासाठी आपण कमीत कमी साखरेचे सेवन करणे गरजेचे आहे.

जास्त गोड खाल्याने शरीरात होतात हे बदल

ॲक्ने

जास्त साखर खाल्ल्याने एंड्रोडनता जास्त प्रमाणात स्राव होतो, ज्यामुळे मुरुमे येऊ शकतात.

अशक्तपणा

जास्त साखर किंवा मिठाईचे सेवन केल्याने शरीरातील ऊर्जेची पातळी कमी होते, ज्यामुळे तुम्हाला अशक्तपणा आणि थकवा जाणवू लागतो. कारण बहुतेक साखरयुक्त पदार्थांमध्ये आवश्यक पोषक तत्वांचा अभाव असतो.

उच्च रक्तदाब

साखरेचा रक्तदाबावरही नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते.

वजन वाढू लागते

चॉकलेट, मिठाई किंवा साखरेचे जास्त सेवन केल्याने वजन वेगाने वाढू लागते.

मूड खराब होणे अथवा वाईट मनस्थिती

आहारातील अतिरिक्त साखरेचे सेवन केले तर त्याचा मूडवर परिणाम होतो. यामुळे सतत चिडचिड होते, मूड खराब होतो.

सांधेदुखी

साखरेचे जास्त सेवन करणे आणि संधिवात हे निगडीत असल्याचे सुचवणारे बरेच संशोधन झाले आहे. म्हणजेच, जर तुमच्या आहारात साखरेचे प्रमाण जास्त असेल तर तुमच्या हाडांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो.

झोप न येणे

अशक्तपणा आणि चिडचिड यामुळे झोपेवरही परिणाम होतो. जास्त गोड खाल्ल्याने झोपेवर वाईट परिणाम होतो.

पोटाच्या समस्या

ज्या लोकांना आधीच आतड्याच्या समस्या आहेत, त्यांनी साखरेचे अतिसेवन केल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते.

मग साखरेला आरोग्यदायी पर्याय कोणता ?

साखरेऐवजी मध किंवा गुळाचे सेवन आरोग्यदायी मानले जाते. पण मध, गूळ आणि साखर यांचा ग्लायसेमिक इंडेक्स समान असल्यामुळे अनेक आरोग्य तज्ञ यावर विश्वास ठेवत नाहीत.


साखरेच्या अतिसेवनामुळे शरीरावर होतात हे दुष्परिणाम