बातम्या
या पाच मुद्रा बनवतील मानसिकरीत्या शक्तिशाली
By nisha patil - 2/17/2024 7:31:24 AM
Share This News:
आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हे हाताच्या कोणत्या न कोणत्या भागाला जोडले गेले आहेत. हातांच्या काही विशेष मुद्रा आहे ज्या केल्याने शरीराला फायदा होतो. सोबत मन आणि मेंदुला अधिक सक्रियता पूर्वक काम करायला मदत होते. योग विज्ञानात अशा अनेक प्रभावशाली हस्त मुद्रा आहे ज्यांचा परिणाम पूर्ण शरीरातील नसांवर होतो. तुम्ही शास्त्रीय नृत्यामध्ये आशा मुद्रा पाहिल्या असतील. चला तर जाणून घेऊया पाच मुद्रा ज्यांचा अभ्यास पद्मासन किंवा सुखासन मध्ये करावा. या मुद्रांना रिकाम्या पोटी केल्यास खूप लाभ मिळतो. तसेच जेवण केल्या नंतर एक तासाने करू शकतात.
1. उत्तरबोधि मुद्रा - ही एक अशी मुद्रा आहे जी केल्याने तुमच्या आंत चेतना संचारते. या मुद्राच्या मदतीने तुमचा मेंदु तुमच्या जवळपास घडणाऱ्या घटनांसाठी नियमित सतर्क राहील.
2. योनि मुद्रा - ही मुद्रा तुमच्या नर्वस सिस्टीमवर प्रभाव टाकते. जर या मुद्रेचा अभ्यास नियमित केला तर तुमची बोलण्याची आणि विचार करण्याची क्षमता विकसीत होते.
3. कालेश्वर मुद्रा - जर तुमच्या मध्ये एखादया गोष्टीला घेऊन उतावेळपणा येत असेल तर ही मुद्रा तुमच्यासाठी उपयोगी आहे. या मुद्राचा अभ्यास व्यक्ती उतावेळपणा कमी करण्यासाठी करू शकतो. तसेच स्वताला स्थिर ठेऊ शकतो. कालेश्वर मुद्रा तुमच्या स्मृतिक्षमतेला वाढवते.
4. विश्वास मुद्रा - खूप वेळेस आपल्या मध्ये आत्मविश्वासाची कमी भासते. या मुद्रेमुळे तुम्ही स्वत:मध्ये एक अतूट विश्वास निर्माण करू शकतात. तुमचा विश्वास वाढतो व तुम्हाला जाणवते की तुम्ही प्रत्येक काम योग्य करू.
5. कली द्रामुद्रा - कुठलेपण नविन काम सुरु करतांना भीती वाटणे स्वाभाविक असते. भीती निघून जावी म्हणून तुम्ही ही मुद्रा करू शकतात. तसेच ही मु तुमच्या हृदय संबंधित अनेक आजारांना दूर करेल.
या पाच मुद्रा बनवतील मानसिकरीत्या शक्तिशाली
|