बातम्या
'ही' फळे रिकाम्या पोटी खाऊ नयेत
By nisha patil - 1/22/2024 7:24:08 AM
Share This News:
आजच्या खराब जीवनशैलीमुळे तंदुरुस्त राहणे देखील कठीण झाले आहे. निरोगी आरोग्यासाठी आपल्या खाण्या-पिण्याची योग्य वेळ असणं देखील महत्त्वाचे आहे. आपल्या आहारात प्रत्येक गोष्ट खाण्यासाठी एक वेळ दिली आहे.
त्यानुसार फळ खाण्याबद्दलही आहारात काही नियम देण्यात आले आहेत. जसे की अनेकांना ही गोष्ट ठाउक नसेल की कॅफिनयुक्त पदार्थांचे रिकाम्या पोटी सेवन करणं आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. या कॅफिनयुक्त पदार्थांमध्ये काही फळांचा देखील समावेश आहे. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, काही फळांचे रिकाम्या पोटी सेवन केल्यामुळे आरोग्याविषयक समस्या देखील उद्भवू शकतात.
फळे आरोग्यासाठी चांगली मानली जातात. मात्र या फळांचे उत्तम आणि योग्य पद्धतीने सेवन करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. फळे खाण्याची योग्य वेळ कधी आहे आणि त्याचे शरीरावर काय परिणाम होतात याची माहिती प्रत्येकाला असणं गरजेचे आहे. दरम्यान 2019 मध्ये बिहारमधील 125 मुलं तापामुळे मृत्यूमुखी पडली अशी बातमी समोर आली होती. सुरुवातीला ताप कशामुळे येतो, नेमकं या मुलांच्या खाण्यात काय आलं हे स्पष्ट होत नव्हते. पण अॅक्युट इन्सेफलाइटिस सिंड्रोम या प्रकारच्या तापाने मृत्यू झाल्याचे उघड झाले. या मुलांनी लिची फळं खाल्ल्याने हा प्रकार घडला अशाही बातम्या प्रसिद्ध झाल्या. कारण लिची हे फळ कच्चं किंवा उपाशीपोटी खाल्याने धोका निर्माण होऊ शकतो.
रिकाम्या पोटी का खाऊ नयेत फळे
फळे खाण्याचे अनेक फायदे आहेत, परंतु जेव्हा तुम्ही ते चुकीच्या वेळी खातात तेव्हा ते तुमचे नुकसान करू शकतात. विशेषतः जेव्हा तुम्ही ते रिकाम्या पोटी खातात. कारण रिकाम्या पोटी कोणत्याही फळाचे सेवन केले तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. रिकाम्या पोटी अॅसिडयुक्त फळांचे कधीही सेवन करू नका. तसेच फळे गोड असतात आणि सकाळी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे मधुमेहाची पातळीही वाढू शकते.
रिकाम्या पोटी कोणती फळे खाऊ नयेत?
केळी
केळी जर रिकाम्या पोटी खाल्लातर पोटॅशियमचे प्रमाण वाढून तुमच्या पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो. यामुळे, पोटाला सकाळपासून सूज येऊ शकते त्यामुळे तुम्ही दिवसभर अस्वस्थ राहू शकता. याशिवाय तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
संत्री आणि मोसंबी
संत्री आणि मोसंबी यासारख्या लिंबूवर्गीय फळांचे सेवन केल्याने तुम्ही आजारी पडू शकता. दोन्ही फळांचे सेवन केल्याने तुमचे पचनक्रिया बिघडू शकते. याशिवाय ते आम्लयुक्त पीएच वाढवते आणि सकाळपासून गॅस होऊ शकते.
किवी
किवीचे सेवन आपल्या पोटासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरु शकते. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे रिकाम्या पोटी घेण हानिकारक ठरू शकते. याचे सेवन केल्याने छातीत जळजळ, आंबट चव आणि आम्लता वाढू शकते. किंवा साखरेमुळे मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढू शकते.
अननस
रिकाम्या पोटी अननस खाण्यायोग्य नाही कारण त्यात फ्रक्टोज जास्त प्रमाणात असते. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन सी सोबत फायबर देखील असते, जे एकत्रितपणे चयापचय कमी करते. त्यामुळे दिवसभर अन्न नीट पचत नाही. त्यामुळे रिकाम्या पोटी किंवा फळांचे सेवन टाळा.
आंबा
तज्ज्ञांच्या मते, रिकाम्या पोटी आंब्याचे सेवन करणे शरीरासाठी घातक ठरू शकते. कारण या फळामध्ये साखरेचा अधिक पुरावा आहे. रिकाम्या पोटी या फळाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी आंब्याचे रिकामी पोटी सेवन करु नये. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित होऊ शकते. यामुळे तुमच्या निरोगी आरोग्याला कोणताही फायदा होणार नाही.
'ही' फळे रिकाम्या पोटी खाऊ नयेत
|