बातम्या
या लोकांनी हळदीचे सेवन करणे टाळावे
By nisha patil - 1/13/2024 7:33:54 AM
Share This News:
भारतात प्रत्येकाच्या किचनमध्ये हळद ही आढळतेच. कारण प्रत्येक भाजीत किंवा इतर पदार्थांमध्ये हळदीचा वापर केला जातो. हळदीमुळे भाजीला रंग ही चांगला येतो. पण हळदीचे शरीराला खूप फायदे देखील असतात.
हळदीला आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. आरोग्यच नाही तर हळद ही सौंदर्य देखील वाढवते. पण तुम्हाला माहित आहे का की काही लोकांसाठी हळदीचे सेवन हे हानिकारक देखील ठरु शकते. हळदीच्या अतिसेवनामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. हळद खाण्याचा सल्ला दिला जातो पण कोणत्या परिस्थितीमध्ये हळद खाणे टाळावे हे जाणून घ्या.
मधुमेहाच्या रुग्णानी जास्त हळद खाणे टाळावे
मधुमेह आणि हळदीचा तसा काहीही संबंध नसला तरी, आयुर्वेदात रक्त पातळ करणारी औषधे घेत असलेल्या रुग्णांना जास्त हळद खाण्याचा सल्ला देत नाही. हळदीचे सेवन केल्याने शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यापासून प्रतिबंध होतो आणि जर रुग्ण त्यासाठी कोणतेही औषध घेत असेल तर हळदीचे जास्त सेवन करणे त्याच्यासाठी हानिकारक ठरू शकते.
कावीळचे रुग्णांनी हळदी खाणे टाळावे
कावीळच्या रुग्णांनी हळदीचे सेवन कमीच करावे. हळदीच्या सेवनाबाबत तुमच्या डॉक्टरांशी नक्की सल्ला घ्यावा.
स्टोनच्या रूग्णांनी हळद टाळावी
ज्या लोकांना स्टोर होत असेल त्यांनी हळद कमी प्रमाणात खावी. हळदीमध्ये विरघळणारे ऑक्सलेटचे उच्च स्तर असतात जे कॅल्शियमशी सहजपणे बांधू शकतात आणि अघुलनशील कॅल्शियम ऑक्सलेट तयार करतात. अघुलनशील कॅल्शियम ऑक्सलेटमुळे ७५% किडनी समस्या उद्भवतात.
अॅनिमियाच्या रुग्णांनी हळद खाणे टाळावे
ज्यांना अॅनिमियाचा त्रास आहे त्यांनी हळदीचे सेवन कमी प्रमाणात करावे. हळदीचे जास्त सेवन केल्याने शरीरात लोहाचे शोषण वाढते आणि त्यामुळे अॅनिमियाची समस्या वाढते.
रक्त पातळ करणारी औषधे घेणारे
रक्त पातळ करणारी औषधे घेणार्यांनी देखील हळदीचे सेवन कमी प्रमाणात करावे. कारण हळदही याच पद्धतीने काम करते आणि औषधांसोबत तिचे सेवन केल्यास समस्या वाढू शकतात.
या लोकांनी हळदीचे सेवन करणे टाळावे
|