बातम्या

‘या’ योगासनाने पोटावरील चरबी होईल कमी, ‘हे’ आहेत ४ फायदे

This Yoga Asana will reduce belly fat these are 4 benefits


By nisha patil - 5/3/2024 9:33:23 AM
Share This News:



वाढते वजन कमी करणे खुप अवघड असते. यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करावे लागतात. आहार, व्यायाम खुप महत्वाचा ठरतो. यास योगासनांची जोड दिल्यास वजन लवकर कमी होऊ शकते. कोणत्या योगासनाने वजन लवकर कमी होऊ शकते आणि त्याचे अन्य कोणते फायदे आहेत, ते जाणून घेवूयात.

हे योगासन करा
भुजंगासन
प्रथम पोटावर झोपा. हनुवटी जमिनीवर टेकवा. दोन्ही हात सरळ मांड्यांजवळ ठेवून तळवे पूर्णपणे जमिनीवर टेकवा. पायांचे अंगठे व टाचा एकमेकांना चिकटून ठेवा, पण चवडे मागे ताणून ठेवा. दोन्ही हात छातीशेजारी टेकवा. हातांची कोपरे आकाशाच्या दिशेने ठेवा. कपाळ टेका, श्वास सोडा व श्वास घेत प्रथम कपाळ व हनुवटी वर उचला. मान मागच्या दिशेने वाकवत खांदे, छाती हळूहळू वर उचला. हात कोपरात सरळ होईपर्यंत वर घ्या. श्वसन संथपणे सुरू ठेवा. आसन सोडताना श्वास सोडत सावकाळ पूर्ववत स्थितीत या.

हे आहेत फायदे
१ पोटातील चरबी कमी होते.
२ खांदे व कंबरेच्या मांसपेशी मजबूत होतात.
३ पोटाच्या मांसपेशी मजबूत होतात.
४ शरीर लवचिक होण्यासही मदत मिळते.


‘या’ योगासनाने पोटावरील चरबी होईल कमी, ‘हे’ आहेत ४ फायदे