बातम्या

'हा' हल्ला मराठा समाजानं केलेला नाही तर समाजकंटकांनी केलेला असावा - संदीप क्षीरसागर

This attack was not carried out by the Maratha community but by social miscreants Sandeep Kshirsagar


By nisha patil - 1/11/2023 4:30:41 PM
Share This News:



 दोन दिवसांपूर्वी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरावर आंदोलकांनी हल्ला चढवला होता. आक्रमक आंदोलकांनी बंगला जाळला, तसेच आवारातही मोठी जाळपोळ केली. याबाबात संदीप क्षीरसागर यांनी फेसबुक पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, योग्य वेळी पुराव्यानिशी बोलेनं, असंही संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यभरातील मराठा आंदोलक आक्रमक झाले पाहायला मिळत आहे. अशातच काहींकडून नेते आणि मंत्र्यांना देखील  टार्गेट केलं जात आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरावर आंदोलकांनी हल्ला चढवला होता. आक्रमक आंदोलकांनी त्याचा बंगला ही  जाळला, तसेच आवारातही मोठी जाळपोळ केली. याबाबात संदीप क्षीरसागर यांनी फेसबुक पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यात त्यांनी म्हटलं आहे कि,
       30 ऑक्टोबर 2023 रोजी बीड शहरात अनेक जाळपोळीच्या घटना घडल्या. माझ्या राहत्या घरावर देखील हल्ला झाला. माझे मुल, पत्नी आणि सर्व कुटुंब यावेळी घरातच होते पण मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील नागरिकांच्या व परमेश्वराच्या आशिर्वादाने आम्ही सर्वजण सुखरूप आहोत.", तसेच . मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक आंदोलने केली. अतिशय शांततेत व  शिस्तीत सर्व आंदोलन करणारा माझा मराठा बांधव हिंसक आंदोलन करू शकणार नाही. काल जो प्रकार घडला तो मराठा समाजाने किंवा स्थानिक लोकांनी केलेला नसुन काही समाजकंटकांनी केला असावा. याबाबत आताच काही बोलणार नाही, तसेच योग्य वेळी पुराव्यानिशी बोलेन.", असं संदीप क्षीरसागर फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहेत.


'हा' हल्ला मराठा समाजानं केलेला नाही तर समाजकंटकांनी केलेला असावा - संदीप क्षीरसागर