बातम्या
नदी पुनरुज्जीवन शेतकऱ्यांचे हितसंबंध जपण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वपूर्ण : राहुल आवाडे
By nisha patil - 4/1/2025 10:40:44 PM
Share This News:
नदी पुनरुज्जीवन शेतकऱ्यांचे हितसंबंध जपण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वपूर्ण : राहुल आवाडे
राहुल आवाडेंची जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक
इचलकरंजी येथील पंचगंगा नदी पात्रातील गाळ शेतकऱ्यांना मोफत काढून नेण्यासाठी आ. राहुल आवाडेंनी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.यावेळी नदी पुनरुज्जीवन व शेतकऱ्यांचे हितसंबंध जपण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वाचा टप्पा ठरेल असे वक्तव्य आ.राहुल आवाडेंनी केल.
इचलकरंजी येथील पंचगंगा नदी पात्रातील गाळ शेतकऱ्यांना मोफत काढून नेण्यासाठी राहुल आवाडेंनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. कोल्हापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयातील या बैठकीत गाळ काढण्याच्या प्रक्रियेवर चर्चा करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना निश्चित करण्यात आलेत. यावेळी नदी पुनरुज्जीवन व शेतकऱ्यांचे हितसंबंध जपण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वाचा टप्पा ठरेल असे आ.राहुल आवाडेंनी यावेळी सांगितले. या बैठकीस जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
नदी पुनरुज्जीवन शेतकऱ्यांचे हितसंबंध जपण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वपूर्ण : राहुल आवाडे
|