बातम्या
दिवाळीमध्ये घराला अशा प्रकारे कार लाईटिंग
By nisha patil - 7/11/2023 7:06:56 AM
Share This News:
काही दिवसांवरच दिवाळी सण येऊन ठेपला आहे. दिवाळी म्हटलं की घराची साफसफाई आली घराची सजावट आली. त्यामुळे लोक दिवाळीच्या आठवडाभर आधीच घराची साफसफाई करत असतात. तसेच घर सजवण्यासाठी नवनवीन उपाय करताना दिसतात.
दिवाळीमध्ये घर सजवण्याची परंपरा ही कायमच आहे. मग लोक अगदी उत्साहाने आपल्या घरामध्ये आकाशकंदील, पणत्यांनी आपलं घर सजवतात. त्यामुळे दिवाळीमध्ये प्रत्येकाचं घर अगदी सुंदर आणि खुलून दिसतं.
दिवाळीमध्ये भिंतींची आणि तुमच्या घरातील खोल्यांची सजावट करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या रंगांच्या लाइटिंग्स निवडू शकता. मग भिंतींवरती तुम्ही गोल्डन, सिल्वर किंवा रंगीबेरंगी माळा सोडू शकता. तसेच तुमच्या घरातील खोल्यांच्या दोन्ही बाजूने तुम्ही दिवे लावू शकता. सोबतच तुमच्या घरात जर तुम्ही झाडांची रोपटे लावली असेल तर त्यावरूनही तुम्ही लाइटिंग्स फिरवू शकता. यामुळे तुमचं घर दिव्यांनी एकदम खुलून दिसेल.
दिवाळीमध्ये तुम्ही तुमचे घर एकाच रंगाच्या लाईटने सजवू शकता. मग यामध्ये तुम्ही लाल रंगाचे दिवे, पिवळ्या रंगाचे दिवे किंवा पांढऱ्या रंगाचे दिवे अशा वेगवेगळ्या रंगांच्या दिव्यांनी तुम्ही तुमचे संपूर्ण घर सजवू शकता. जर तुम्ही लाइटिंग्समध्ये एका रंगाचा वापर केला तर तुमचे संपूर्ण घर एका रंगात अगदी उठून दिसेल. त्यामुळे बाजारात जाऊन तुम्ही कोणत्याही एका रंगाच्या लायटिंगस विकत घेऊन तुमच्या घराची सजावट करू शकता.
तुम्ही तुमच्या घरातील दरवाजे आणि खिडक्यांवरती देखील लाइटिंग्सने वेगवेगळ्या डिझाइन्स करू शकता. यामुळे तुमचे घर थोडे हटके दिसण्यास मदत होईल. मग यामध्ये तुम्ही दारांसाठी एका रंगाच्या लाइटिंग्स तर खिडक्यांसाठी दुसऱ्या रंगाच्या लाइटिंग्स निवडून दोन्ही वेगवेगळ्या रंगांचे मिश्रण करून तुमचे घर सजवू शकता.
दिवाळीमध्ये घराला अशा प्रकारे कार लाईटिंग
|