बातम्या
हा छत्रपती शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा विजय : राजेश क्षीरसागर
By nisha patil - 4/6/2024 10:28:40 PM
Share This News:
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात कोल्हापूर उत्तर या मतदारसंघात कॉंग्रेस उमेदवार मताधिक्य घेईल, असे जाणकारांचे मत झाले होते. पण, निकालानंतर फक्त १४,१४३ इतक्या मताधिक्याने कॉंग्रेस पुढे राहिली. उत्तर मतदारसंघांमध्ये असलेल्या मतांचा विचार केला तर छत्रपती शाहू महाराज हे शहरातील स्थानिक उमेदवार असताना देखील १४,१४३ एवढ्या मतांनी पुढे आहेत. एकंदरीत कोल्हापूर शहर नेहमीच शिवसेना व महायुतीचा बालेकिल्ला राहिलेले आहे हे यावरून सिद्ध होते.
वडिलांचे दु:खद निधनानंतर दिवसकार्य संपल्या-संपल्या तातडीने प्रचार यंत्रणा गतिमान करत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत भाजप, राष्ट्रवादी व मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना एकत्र घेवून प्रचारात आघाडी घेतली. म्हणूनच महायुती फार मोठ्या मतांनी शहरामध्ये पाठीमागे राहिलेली नाही. महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांचे मनपूर्वक आभार.. मतदारांनी दाखविलेला विश्वास हा पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेल्या कामाची पोचपावती आहे. कोल्हापूर शहरास कोट्यावधी रुपयांचा निधी मुख्यमंत्री ना.मा..एकनाथ शिंदे साहेब यांनी दिला असून, शहरवासीयांनी मतदानाद्वारे दाखविलेला विश्वास ही त्याची पोचपावती म्हणावी लागेल. नूतन खासदार छत्रपती शाहू महाराज यांचे विजयाबद्दल अभिनंदन.. राजर्षी शाहू महाराजांना अभिप्रेत कार्याची अपेक्षा छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून व्यक्त करतो.
श्री.नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपत घेताना दिसतील आणि खऱ्या अर्थाने आगामी काळात देश जागतिक महासत्ता बनताना दिसेल, अशी प्रतिक्रिया राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली.
हा छत्रपती शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा विजय : राजेश क्षीरसागर
|