बातम्या
हिवाळ्यात कफवर रामबाण आहे हा उपाय, सेवन करताच दूर पळेल खोकला
By nisha patil - 9/12/2023 7:20:04 AM
Share This News:
हिवाळ्यात सर्दी-खोकल्यासारखे आजार लवकर जडतात. खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी अनेक पद्धती वापरल्या जातात, परंतु आराम मिळणे कठीण असते. घरातील काही नैसर्गिक वस्तू खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी उपयोगी आहेत. सर्दी आणि खोकल्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी घरगुती उपाय खूप प्रभावी आहेत. खोकला आणि सर्दीपासून मुक्त होण्यासाठी मध, लवंग आणि वेलचीपासून कफ सिरप बनवता येते. हा उपाय खूप फायदेशीर आहे
मध आणि लवंगचे कफ सिरप
मध, लवंग आणि वेलची कफ दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात आणि रोग बरे करण्यास मदत करतात.असे तयार करा कफ सिरप
कफ सिरप बनवण्यासाठी प्रथम वेलची आणि लवंगा मंद आचेवर भाजून घ्या. वेलची आणि लवंगा बारीक करून घ्या. त्यात मध घाला. कफ सिरप तयार आहे. एका छोट्या बाटलीत भरून ठेवू शकता.
असे सेवन करा
मध हलके गरम करून खाल्ले तर खोकल्यामध्ये लगेच आराम मिळू लागतो. थंड मध खाणे हानीकारक ठरू शकते, म्हणून कफ सिरप सेवन करण्यापूर्वी ते थोडे कोमट करा. हे कफ सिरप दिवसातून ३ वेळा प्यावे.
या टिप्सदेखील फायदेशीर
– सर्दी आणि फ्लूपासून मुक्त होण्यासाठी गरम पाणी पिणे फायदेशीर आहे. गरम पाण्यात हळद टाकूनही गुळण्या करता येतात. यामुळे कफ जाईल.
– तुपासोबत काळी मिरी खाल्ल्याने खोकल्यामध्ये आराम मिळतो. काळ्या मिरीमध्ये असलेले गुणधर्म रोगांशी लढण्याची शक्ती वाढवतात.
– आल्याचा चहा प्यायल्याने घशाची सूज आणि सर्दीमध्येही आराम मिळेल.
– भाजलेला लसूण खाणेदेखील फायदेशीर आहे. तुपात भाजून लसूण खाल्ल्याने खोकल्याची समस्या दूर होते.
हिवाळ्यात कफवर रामबाण आहे हा उपाय, सेवन करताच दूर पळेल खोकला
|