बातम्या
यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार गुजरातमध्ये
By nisha patil - 12/29/2023 5:14:56 PM
Share This News:
यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार गुजरातमध्ये
हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांमध्ये 'फिल्मफेअर पुरस्कारां'ची चांगलीच क्रेझ असते. आता यंदाच्या पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षकांना बॉलिवूडकरांना उत्सुकता आहे. 'फिल्मफेअर अवॉर्ड 2024' हा पुरस्कार सोहळा यंदा गुजरातमध्ये होणार आहे.
फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024' हा हिंदी मनोरंजनसृष्टीतील सर्वात ग्लॅमरस आणि जुना पुरस्कार सोहळा आहे. आता 69 व्या पुरस्कार सोहळ्यासाठी रेड कार्पेट सज्ज आहे. या पुरस्कार सोहळ्यात अनेक सेलिब्रिटींचा त्यांच्या कामासाठी गौरव होणार आहे.
या पुरस्कार सोहळ्यात सेलिब्रिटी आपल्या जबरदस्त सादरीकरणाने रेड कार्पेटवर आग लावतात. आता 69 व्या पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
28 जानेवारी 2024 रोजी गुजरातमधील गांधीनगरमध्ये 'फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024' हा पुरस्कार सोहळा होणार आहे.'फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024'मध्ये प्रेक्षकांना मजा, मस्तीसह कलाकारांचं धमाकेदार नृत्य सादरीकरण आणि अभिनेत्रींच्या हॉट अदा पाहायला मिळणार आहेत.
आलिया भट्टला 'फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023'मध्ये 'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमासाठी पुरस्कार मिळाला आहे. या सिनेमातील भूमिकेसाठी तिचा गौरव करण्यात आला आहे. तर राजकुमार रावलादेखील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
जुलै 2023 मध्ये गुजरात पर्यटन निगम लिमिटेडन 69 व्या फिल्मफेअर पुरस्कारांच्या आयोजन करण्याचं ठरवलं होतं. या पुरस्कार सोहळ्यात गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलदेखील उपस्थित असणार आहेत. त्यांच्यासह बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफदेखील हिंदी सिनेसृष्टीचं प्रतिनिधित्व करताना दिसून येईल.
टायगर आणि गुजरातचं एक खास नातं आहे. याबद्दल बोलताना टायगर म्हणाला,"गुजरात आणि माझं खास नातं आहे. माझे आजोबा हे गुजरातचे आहेत. तसेच फिल्मफेअर हा पुरस्कार सोहळादेखील माझ्यासाठी खूप खास आहे. 1990 रोजी मी पहिल्यांदा या पुरस्कार सोहळ्यासोबत जोडलो गेलो. हा एक अद्भुत अनुभव आहे"
यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार गुजरातमध्ये
|