बातम्या
50 हजार रुपये शेतकऱ्यांचे अनुदान मिळणेसाठी स्वाभिमानीचे ठिय्या आंदोलन
By nisha patil - 6/10/2023 7:49:14 PM
Share This News:
शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान रुपये 50 हजार मिळाले शिवाय स्वस्त बसणार नाही .असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष वैभव कांबळे यांनी केले, ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आयोजित केलेल्या ठिय्या आंदोलनात बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटने ने प्रोत्साहन अनुदान पासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सहकार उपनिबंधक यांचे कार्यासमोर जिल्हा अध्यक्ष वैभव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन केले.
याप्रसंगी वैभव कांबळे म्हणाले की ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना रुपये 50 हजार प्रोत्साहन अनुदान शासनाने जाहीर केले होते. त्यामध्ये काही शेतकऱ्यांना हे अनुदान मिळाले अद्याप 20% शेतकऱ्यांना सदरचे अनुदान मिळालेले नाही, त्यांना अनुदान तात्काळ द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला .
यावेळी तालुका अध्यक्ष अप्पासाहेब एडके ,उपाध्यक्ष बाळगोडा पाटील, एडवोकेट सुरेश पाटील ,अण्णासाहेब शहापुरे, सुभाष पाटील यांनी मनोगत व्यक्त केले .या आंदोलनामध्ये जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पाटील, जिल्हा सरचिटणीस शिवाजी पाटील ,कुमार जगोजी ,अण्णा मगदूम ,अमित पाटील,शिवाजी आंबेकर,रमेश गायकवाड ,बाळासाहेब पाटील , महेश पांडव, सुनील वडगावे ,पंकज पाटील, दादा पाटील ,अंकुश चव्हाण, महावीर चौगुले ,श्रीकांत करके, निलेश पाटील, मनोहर देसाई आदी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
50 हजार रुपये शेतकऱ्यांचे अनुदान मिळणेसाठी स्वाभिमानीचे ठिय्या आंदोलन
|