ग्रामीण
रस्ते अपघातात मदत करणाऱ्याला मिळणार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र -जिल्हाधिकारी अमोल येडगे
By nisha patil - 1/21/2025 10:58:09 PM
Share This News:
रस्ते अपघातात मदत करणाऱ्याला मिळणार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र -जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर : रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी "रोड सेफ्टी हिरो" बनण्याचे आवाहन केले, तसेच रस्त्यावरील अपघातात तातडीने मदत देणाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली. कार्यक्रमात प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. त्यांनी रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे महत्त्व सांगितले.
रस्ते अपघातात मदत करणाऱ्याला मिळणार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र -जिल्हाधिकारी अमोल येडगे
|