बातम्या
विचारेमाळ धरणीमाता हौ. सोसायटीत साडीच्या दुकानाला आग
By nisha patil - 1/13/2024 4:28:26 PM
Share This News:
कोल्हापूर विचारेमाळ परिसरातील धरतीमाता हौसिंग सोसायटी इथ भाड्याने राहणाऱ्या महम्मद रफिक आलीयांच्या साडी दुकानाला आज दुपारी आग लागली.या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र नवीन साड्या आणि इतर साहित्य जळून सुमारे 10 लाखाचे नुकसान झालंय. कसबा बावडा आणि ताराराणी पुतळा अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.
विचारेमाळ परिसरातील धरणीमाता हौसिंग सोसायटी इथ सुनिता कांबळे याच घर आहे.सुनिता कांबळे या कुटुंबीयांसमवेत इथ राहतात. कांबळे यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर उत्तर प्रदेशातील महमद
रफिक आली हे गेल्या 4 वर्षापासून कुटुंबीय समवेत भाड्याने राहतात.साड्यांना हस्तकलेतून गोंडे
तसेच लेस लावून उंची साड्या तयार करण्याचा व्यवसाय आहे.आज दुपारी महमद रफिक आली हे सदर बाजार येथील मशीद मधे नमाज पठन करण्यासाठी गेले होते.यावेळी त्यांच्या घरातून आगीचे लोट येत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल.त्यांनी तात्काळअग्निशमन दलाशी संपर्क साधून
याची माहिती दिली.कसबा बावडा आणि ताराराणी पुतळा फायर स्टेशनचे जवान घटनास्थळी दाखल झाले.महमद अली हे देखील कुटुंबियां समवेत इथ आले.आगिच भीषण दृश्य पाहून त्यांना अश्रू अनावर झाले. दरम्यान अग्निशमन दलचे जवान आणि स्थानिक नागरिकांचा मदतीने जवळपास तासभर प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली.या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी साड्या त्यावर कलाकुसर करण्याचे साहित्य आणि मशिनरी जळून खाक झाल यात सुमारे 10 लाखाचे नुकसान झालंय.ही आग आटोक्यात आणण्यासाठी स्टेशन ऑफिसर मनीष रनभिसे,जयवंत खोत,ओंकार खेडकर,.नवनाथ कांबळे,सैफ म्हालदार नवनाथ साबळे,माणिक कुंभार,विजय पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
विचारेमाळ धरणीमाता हौ. सोसायटीत साडीच्या दुकानाला आग
|