बातम्या

संत ज्ञानेश्वर महाराजांचे सुविचार 

Thoughts of Sant Dnyaneshwar Maharaj


By nisha patil - 5/31/2023 8:45:37 AM
Share This News:



संत ज्ञानेश्वर हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक. योगी व तत्त्वज्ञ होते. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्यरचना आहेत. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना आध्यात्मिक लोकशाहीची प्रेरणा मिळाली.


मला जे मिळू शकले नाही,
त्याबाबत दु:ख करत राहण्याऐवजी,
जे काही मिळाले आहे त्याबाबत मी आभारी असले पाहिजे
जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी
हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल,
तेव्हा ती संधी मी गमावता कामा नयेआज जरी यश, सुख, समृद्धी
माझ्या पायाशी लोळण घेत असली,
तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते
याची सतत जाणीव ठेवून,
मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे.
– संत ज्ञानेश्वर


संत ज्ञानेश्वर महाराजांचे सुविचार