बातम्या

वारणा नदी पात्रात दूषित पाणी मिसळल्याने हजारो माशांचा मृत्यू

Thousands of fish died due to mixing of contaminated water in the Warna river bed


By nisha patil - 12/26/2023 4:56:10 PM
Share This News:



वारणा नदी पात्रात दूषित पाणी मिसळल्याने हजारो माशांचा मृत्यू


वारणानगर : कोल्हापूर व सांगली जिल्हा जोडणाऱ्या वारणा नदीच्या चिकुर्डे पुलाजवळील नदीपात्रात दूषित मळी मिश्रित पाणी मिसळल्यामुळे हजारोच्या संख्येने मासे मृत्यूमुखी पडल्याचे सोमवारी निदर्शनास आले. त्यामुळे नदीकाठावर अत्यंत दुर्गंधी पसरली आहे.
   

वर्ण नदीपात्रात चिकुर्डे बंधाऱ्याजवळ पाणी अडविल्याने नदी भरून वाहत आहे. त्या पाण्याचा दुर्गंधी येत आहे. नदीच्या पाण्यात मळी मिश्रित पाणी मिसळल्यामुळे हजारोंच्या संख्येने लहान मोठे मासे मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती पसरताच परिसरातील लोकांनी एकच गर्दी नदीकाठावर केली होती. लोकांसह जमलेले ने मासे पकडून नेले नदी काठावर मेलेल्या अवस्थेत एक माशांचा मोठा खच पडला होता त्यामुळे काही प्रमाणात मृत माशामुळे दुर्गंधी पसरली.


वारणा नदी पात्रात दूषित पाणी मिसळल्याने हजारो माशांचा मृत्यू