बातम्या

कोल्हापुरात हजारो लिटर पाणी वायफळ वाया

Thousands of liters of water was wasted in Kolhapur


By nisha patil - 3/27/2024 6:24:28 PM
Share This News:



कोल्हापुरात आयटीआय ते रंकाळा येथील पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे मोठ्या संख्येने पाणी वाया गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. मोठ्या गटारी मधून अक्षरशः पाण्याचा धो धो जलप्रवाह पाहायला मिळाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली असून, या
 

लिकेजमुळे अंदाजे  हजारो लिटर पाणी वाया गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लिकेजमुळे हजारो लिटर पाणी वाया गेल्यामुळे  तेथील परिसरातील  नागरिकांनी अक्षरशः नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे तेथील नागरिक हवालदिल झाले आहेत.
 एकीकडे कोल्हापुरात नागरिकांना पाण्याच्या अक्षरशः तुटवडा भासत आहे. कित्येक दिवस  तर लोकांना पाणी मिळत नाही तर दुसरीकडे अशा पद्धतीने पाण्याचा साठा  वाया जात असल्याचे चित्र पाहायला मिळालं. ही गोष्ट नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी महापालिकेस माहिती दिली. त्यानंतर महानगरपालिकेने ताबडतोब यावर ॲक्शन घेतली आणि पाईप लिकेचं काम केलं. या घटना वारंवार  घडत असून यावर तात्पुरता उपाय नको  कायमस्वरूपी लीकेज समस्या सोडवा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे


कोल्हापुरात हजारो लिटर पाणी वायफळ वाया