बातम्या

मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन, बॉम्ब हल्ल्याची धमकी

Threatening call to Mumbai police again threat of bomb attack


By nisha patil - 7/10/2023 5:04:01 PM
Share This News:



मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट  असल्याचा धमकीचा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला होता. यामुळे यंत्रणांनी अलर्ट मोडवर जाऊस तपास करत फोन करुन धमकी देणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला धमकीचा फोन आला होता. यानंतर हा फोन आणि या व्यक्तीचा शोध सुरु झाला. दरम्यान, पोलिसांनी तपास केला असता, फोन करणाऱ्याने दारूच्या नशेत हा कॉल केल्याचे निष्पन्न झालं. कॉल करणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीच्या कॉल प्रकरणी नागेंद्र ज्ञानेंद्र शुक्ला या 30 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. वनराई पोलिसांनी दिंडोशी येथून संबंधित आरोपीला अटक केली आहे. या व्यक्तीने शुक्रवारी रात्री उशीरा मुंबई नियंत्रण कक्षाला कॉल केला होता. या व्यक्तीने पोलिसांना कॉल करत बॉम्ब हल्ल्याची धमकी दिली होती. त्याने फोनवर सांगितलं होतं की, पाकिस्तानमधून आलो आहोत सांभाळून रहा. तुमच्या बाजूला दोन-तीन तासात बॉम्ब फुटेल, अशी धमकी कॉलरने दिली होती. त्याने कॉल दरम्यान सीमा हैदरचा देखील उल्लेख केला होता. आरोपीने दारूच्या नशेत धमकी दिली होती.

मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला याआधीही अनेकदा धमकीचे फोन आले आहेत. अनेकदा पोलिसांना असे फेक कॉल येतात. यापूर्वी 31 ऑगस्ट रोजी मंत्रालय उडवून देण्याची धमकी देणारा फोन आला होता. यानंतर, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी शोधमोहीम राबवली असता, धमकीचा फोन अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी बाळकृष्ण भाऊसाहेब ढाकणे नावाच्या व्यक्तीने केल्याचं आढळून आलं.

याआधीही 18 सप्टेंबरला मुंबई पोलीस  कंट्रोलला धमकीचा फोन  आला होता. मुंबईत काही लोक बॉम्ब बनवत असून आणि हल्ल्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती एका निनावी व्यक्तीने फोन करुन कंट्रोल रूमला  दिली होती. यानंतर यंत्रणा हा अलर्ट मोडवर आल्या  आणि या फोननंतर मुंबई पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला आणिन करणाऱ्याला अटक केलं.


मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन, बॉम्ब हल्ल्याची धमकी