दिव्यांग बांधवांचा प्रांत कार्यालयावर तिरडी मोर्चा

Three day march of disabled brothers at the provincial office


By nisha patil - 5/30/2023 7:55:49 PM
Share This News:



इचलकरंजी : प्रतिनिधी  इचलकरंजी महापालिकेने दिव्यांगांना निधीतील फरकाच्या रक्कमेचे वितरण करावे  ,यासह विविध मागण्यांसाठी
दिव्यांग बांधवांनी सावली दिव्यांग संस्थेच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर तिरडी मोर्चा काढला. यावेळी शासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करून शंखध्वनी करण्यात आला.त्यामुळे प्रांत कार्यालय परिसर दणाणून गेला.तद्नंतर शिष्टमंडळाने प्रांताधिकारी मोसमी बर्डे चौगुले यांना निवेदन सादर करुन आपली कैफियत मांडली.

दिव्यांग बांधवांना समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन विविध स्तरांवर प्रयत्नशील असते.माञ , प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ मिळत नाही ,असा सावली दिव्यांग संस्थेचा आरोप आहे.वास्तविक ,
शासन आणि महापालिकेकडून
दिव्यांगांना आर्थिक सहाय्य म्हणून 
निधी वितरीत केला जातो. दरवर्षी महापालिकेकडून वार्षिक अंदाजपत्रकाच्या ५ टक्के निधी दिव्यांगांना दिला जातो. मात्र दोन वर्षे
या निधीच्या फरकाची रक्कम मिळालेली नाही. दिव्यांगांना किमान वेतन कायद्यानुसार १५ हजार पेन्शन दिली जात नाही. यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार आंदोलने छेडूनही शासन आणि
महापालिका प्रशासन दुर्लक्षच करीत आहे. त्यामुळे इचलकरंजी शहरात सावली दिव्यांग संस्थेच्या वतीने 
 शिवतीर्थापासून भर उन्हात सरकारच्या प्रतीकात्मक तिरडी मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. हा मोर्चा प्रांत कार्यालय येथे आल्यानंतर त्याठिकाणी सरकारच्या विरोधात
शंखध्वनी करण्यात आला.तदनंतर  शिष्टमंडळाने प्रांताधिकारी मोसमी बर्डे-चौगुले यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडली.तसेच महापालिकेत दिव्यांगांच्या प्रश्नांकडे गांभीर्य लक्ष द्यावे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या कार्यालयातील दलाली थांबवावी, प्रलंबित मागण्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली.या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत दिव्यांगांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत प्रांताधिकाऱ्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावून सदर प्रश्नांबाबत तातडीने कार्यवाही करावी ,अशा सूचना केल्या.
या आंदोलनात दिव्यांग कल्याण सेवा संस्थेचे अनिल पाटील , सुधीर लोले , प्रकाश शानवाडे ,शोभा पाटील ,उज्वला जाधव , महानंदा पाटील ,वहिदा शेख ,
सावली दिव्यांग संस्थेचे राजकुमार गेजगे , जगन्नाथ कुंभार , श्रीकांत देसाई , सदाशिव गदाळे , दिलीप बनसोडे व अन्य सहभागी झाले होते.


दिव्यांग बांधवांचा प्रांत कार्यालयावर तिरडी मोर्चा