बातम्या

सायबर चौकातील अपघातात तीन ठार

Three killed in an accident at Cyber ​​Chowk


By nisha patil - 3/6/2024 6:25:31 PM
Share This News:



कोल्हापूर : पुण्यातील पोर्शे या आलिशान भरधाव कारनं दोघांचा जीव घेतल्याच्या अपघातानं देशाला हादरवून टाकलेलं असतानाच आता कोल्हापुरातील एक भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये भरधाव वेगात असलेल्या एका कारनं सायबर चौकात चार ते पाच दुचाकींना जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की त्यामुळं धडक दिलेल्या दुचाकी उडून इतर दुचाकींना धडकल्या त्यावरील लोकही 'कॅरम बोर्ड' फोडल्याप्रमाणं उडाली. या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.


सायबर चौकातील अपघातात तीन ठार