बातम्या

पंढरपूर मार्गावर अपघातात मृत बानगेच्या वारकऱ्याच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तीन लाख रुपये

Three lakh rupees from the Chief Minister


By nisha patil - 8/18/2023 6:15:30 PM
Share This News:



बानगे ता.कागल येथील कै. लक्ष्मण शंकर शिंदे, वय ७४ यांचा  तीन महिन्यापूर्वी पंढरपूरला जाताना अपघाती मृत्यू झाला होता. देवदर्शनासाठी जात असताना दि. १७ मे २०२३ रोजी हा अपघात झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून  तीन लाख रुपयांची मदत मिळाली. मदतीचा हा धनादेश महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते कागलमध्ये शिंदे कुटुंबीयांकडे देण्यात आला.
         
याबाबत अधिक माहिती अशी, नातेवाईकांच्या सोबत पंढरपूरला जात असलेल्या कै. लक्ष्मण शंकर शिंदे यांच्या चारचाकी गाडीला अपघात होऊन त्या अपघातात एकूण सहा जण ठार झाले होते. त्यापैकी;  कै लक्ष्मण शिंदे हे कागल तालुक्यातील बानगे गावाचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
     
नामदार मुश्रीफसाहेबांचा दिलासा........!
धनादेश स्वीकारल्यानंतर त्यांचा मुलगा श्री. रघुनाथ लक्ष्मण शिंदे म्हणाले, आमचे वडील कै. लक्ष्मण शिंदे अपघातात गेल्यानंतर आमच्या कुटुंबाला लवकरात लवकर मदत  मिळवून देण्यासाठी गोरगरीबांचे कैवारी नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी तातडीने प्रयत्न केले आणि हा धनादेश मिळाला. मीसुद्धा दिव्यांग आहे. गोरगरीबांचा दुःखभार हलका करण्यासाठी मंत्री श्री. मुश्रीफसाहेब अहोरात्र कार्यरत असतात याचा आम्हाला दिलासा वाटतो.
..........................................      
*पंढरपूर रस्त्यावर अपघाती मृत्यू झालेल्या बानगे ता. कागल कै. लक्ष्मण शंकर शिंदे यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तीन लाख रुपयांचा धनादेश नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार सौ. अर्चना कुलकर्णी व महसूल सहाय्यक भारती चौगुले आदी उपस्थित होते


पंढरपूर मार्गावर अपघातात मृत बानगेच्या वारकऱ्याच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तीन लाख रुपये