बातम्या

कोल्हापूरच्या तिघांना सांगलीत पडला बारा लाखाचा गंडा

Three people from Kolhapur were robbed of twelve lakhs in Sangli


By nisha patil - 12/26/2023 4:57:32 PM
Share This News:



कोल्हापूरच्या तिघांना सांगलीत पडला बारा लाखाचा गंडा

खाजगी भिशीच्या माध्यमातून परतावा देण्याचे आमिष दाखवून कोल्हापूर परिसरातील कसबा बावडा येथील तिघांची बारा लाख दहा हजार रुपयाची फसवणूक केल्या चा प्रकार नुकताच घडला या प्रकरणी अमित बाळासाहेब ठाणेकर यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे त्यानुसार मिलिंद संभाजी चव्हाण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय ठाणेकर यांचा संशयित आरोपी चव्हाण हा नातेवाईक असून याने ठाणेकर यांना खाजगी भिशीतून चांगला परतावा देतो असं आमिष दाखवलं आणि चव्हाण हा नातेवाईक असल्याने ठाणेकर यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यानंतर 2018 पासून चव्हाण यांच्या शिवशंकर भिशी मंडळ हरिपूर या खाजगी भिशीमध्ये पैसे गुंतवण्यास त्यांनी सुरुवात केली.

ठाणेकर आणि त्यांची पत्नी अंजली ठाणेकर भाऊ रणजीत ठाणेकर यांनीही पैसे यामध्ये गुंतवले तिघांनीमिळवून आतापर्यंत बारा लाख दहा हजार रुपये त्या भिशीमध्ये गुंतवले असून भिशीची मुदत संपल्यानंतर ठाणेकर यांनी पैसे परत मिळण्यासाठी विचारणा केली तेव्हा चव्हाण यांनी टाळ टाळ करण्यास सुरुवात केली त्यामुळे ठाणेकर यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत चव्हाण यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली असून त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे


कोल्हापूरच्या तिघांना सांगलीत पडला बारा लाखाचा गंडा