बातम्या

डी वाय पाटील विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांची ‘एमएएस’कडून यंग असोसिएट व फेलो म्हणून निवड

Three professors of DY Patil University Selection


By nisha patil - 12/23/2024 3:02:18 PM
Share This News:



डी वाय पाटील विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांची
‘एमएएस’कडून  यंग असोसिएट व फेलो म्हणून निवड

डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांची महाराष्ट्र अकादमी ऑफ सायन्सेसच्या (एमएएस) २०२४ च्या प्रतिष्ठित यंग असोसिएट आणि फेलो म्हणून निवड झाली आहे.

विद्यापीठाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. अर्पिता पांडे तिवारी यांची जीवशास्त्र विषयासाठी तर डॉ. विश्वजीत खोत यांची भौतिक शास्त्र विषयासाठी यंग असोसिएट म्हणून आणि डॉ. जे. एल. गुंजकर यांची फेलो म्हणून निवड झाली आहे.

महाराष्ट्र अकादमी ऑफ सायन्सेस ही विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी आणि संशोधक व वैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेली प्रतिष्ठित संस्था आहे. प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. जी. डी. यादव या संस्थेचे अध्यक्ष आहेत.

  डॉ. पांडे-तिवारी, डॉ.गुंजकर, डॉ. खोत यानी विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली असून विद्यापीठाचे संशोधन कार्यातील योगदानही अधोरेखित झाले आहे. या सर्वांना विद्यापीठाचे रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले.

   या निवडीबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी तिन्ही प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे.


डी वाय पाटील विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांची ‘एमएएस’कडून यंग असोसिएट व फेलो म्हणून निवड
Total Views: 64