बातम्या

विवेकानंदचे तीन छात्र दिल्ली थल सैनिक कॅम्पसाठी रवाना

Three students of Vivekananda left for Delhi Thal Sainik Camp


By nisha patil - 8/29/2024 7:42:20 PM
Share This News:



विवेकानंद महाविद्यालयातील एनसीसी विभागातील खालील तीन छात्रांची दिल्ली येथील थल सैनिक कॅम्पसाठी निवड झाली होती. यामध्ये ज्युनिअर अंडर ऑफिसर  सेला रेगे, बी.एस्सी.बायोटेक भाग 3  हिची हेल्थ ॲण्ड हायजिन या इव्हेंटसाठी ,  सिनिअर अंडर ऑफिसर  चेतन पवार , बी.कॉम.भाग 3  व सार्जण्ट  सार्थक कुलकर्णी 12 वी आर्टस  याची फायरींग इव्हेंट साठी निवड झाली असून वरील तीनही छात्र थल सैनिक कॅम्पसाठी दिल्ली येथे रवाना झाले आहेत.

या निवडीबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य मा..अभयकुमार साळुंखे, सेक्रेटरी मा.प्राचार्या सौ शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी अभिनंदन केले. 

 वरील छात्रांना 5 महाराष्ट् बटालियनचे कर्नल मानस दीक्षित, कर्नल सुहास काळे, 6 महाराष्ट्र बटालियनचे कर्नल संधान मिश्रा,  कॅप्टन सुनीता भोसले, लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा,  प्रबंधक श्री. रघुनाथ जोग मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.


विवेकानंदचे तीन छात्र दिल्ली थल सैनिक कॅम्पसाठी रवाना