बातम्या

शेणवडेत तीन गव्हे व्हिहिरीत पडले?

Three wheat fell in the well in the dunghill


By nisha patil - 4/5/2024 5:06:32 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी शेणवडे, (ता.गगनबावडा) येथील डॉ. पवार यांच्या फार्म हाऊस च्या शेजारील विहिरीत पडलेल्या मादी जातीच्या तीन गव्यां पैकी दोन गव्यांना सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले, परंतु यामध्ये एका गव्याचा विहिरीतील पाण्यात गुदमरून मृत्यू झाला.

गुरुवारी रात्री पाण्याच्या शोधात आलेले मादी जातीचे तीन गवे विहिरीत पडले असल्याची बाब सकाळी निदर्शनास आल्यानंतर येथील नागरिकांनी वन विभागाला याची माहिती दिली. त्यानुसार वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कोल्हापूर येथील रेस्क्यू टीमला पाचारण केले. दुपारी बारा ते तीन दरम्यानच्या काळात चाललेल्या या मोहिमेमध्ये रेस्क्यू टीमला दोन जिवंत गव्यांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. गव्यांना विहिरीतून बाहेर काढताच ते जंगलाच्या दिशेने पळत सुटले. मात्र एका गव्याचा विहिरीतील पाण्यात गुदमरून मृत्यू झाल्याने पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून शवविच्छेदन करण्यात आले. तिन्ही गवे दोन ते अडीच वर्षांचे व मादी जातीचे असल्याचे वनविभागाने सांगितले.

यावेळी वनविभागाचे वनपाल संभाजी चरापले, वनरक्षक नितीन शिंदे, प्रियांका देसाई, प्रकाश खाडे, ओंकार भोसले, तसेच सर्व वनसेवक व कोल्हापूर रेस्क्यू टीम चे कर्मचारी उपस्थित होते.


शेणवडेत तीन गव्हे व्हिहिरीत पडले?