बातम्या
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास तीन वर्षे सक्त मजुरी...
By nisha patil - 4/17/2024 12:57:59 PM
Share This News:
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीडित मुलगी ही आरोपीच्या घराशेजारी राहत होती. सप्टेंबर 2021 मध्ये आरोपी सुरेश हिंदुराव कांबळे यांने घराशेजारी राहणाऱ्या पीडित अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन तिचा विनयभंग केला होता. याप्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकानी शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल केला होता.शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस एस पाटील यांनी याप्रकरणी तपास करून आरोपी सुरेश कांबळे यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपत्र दाखल केलं होतं. आज प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश के बी अग्रवाल यांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सुरेश हिंदुराव कांबळे याला तीन वर्षे सकत्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावलीय.अशी माहिती सरकारी वकील एडवोकेट अमिता कुलकर्णी यांनी दिलीय.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास तीन वर्षे सक्त मजुरी...
|