बातम्या
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे थरारक फोटो बाहेर
By nisha patil - 4/3/2025 5:18:38 PM
Share This News:
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे थरारक फोटो बाहेर
हत्या करताना व्हिडीओ शूट, सीआयडीच्या चार्जशीटमध्ये फोटो
नुकतेच सीआयडीने दाखल केलेल्या चार्जशीटमधून संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचे थरारक तपशील समोर आले आहेत. हत्येच्या वेळी आरोपींनी व्हिडीओ शूट केला होता आणि त्याचे स्क्रीनशॉट्स आता पुराव्यासाठी वापरण्यात आले आहेत.
या फोटोमध्ये संतोष देशमुख यांना निर्दयपणे मारहाण केली जात असतानाचे क्षण कैद झाले आहेत. कोणीतरी दांडक्याने मारताना दिसतो, तर कोणीतरी मानेवर पाय ठेवून अमानवी वागणूक देताना दिसतो. इतकेच नव्हे, तर त्यांच्या मृतदेहावरही मारहाण सुरूच होती.या घटनाक्रमात काही आरोपी हसत-खिदळत असल्याचेही व्हिडीओतून स्पष्ट होते. त्यामुळे या हत्येचा क्रूरपणा आणि आरोपींच्या मनोवृत्तीबद्दल धक्का बसतो आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे थरारक फोटो बाहेर
|