बातम्या

धर्मवीर 2' मध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या उठावाची थरारक कहाणी...?

Thrilling story of Chief Minister Shinde s uprising in Dharamveer 2


By nisha patil - 11/27/2023 5:39:18 PM
Share This News:



धर्मवीर आनंद दिघे  यांच्या आयुष्यावर आधारित 'धर्मवीर' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि तुफान गाजला. आता लवकरच या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या सिनेमाच्या शुटिंगला आजपासून सुरुवात झाली आहे. सुरत, गुवाहाटी ते मंत्रालय एकनाथ शिंदेंच्या उठावाची थरारक कहाणी या सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या शुभारंभादरम्यान एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
   एकनाथ शिंदे 'धर्मवीर 2' या सिनेमात मुख्यमंत्री म्हणून दिसणार आहे. त्यामुळे शिंदेंच्या उठावाची कहाणी दुसऱ्या भागात उलगडणार का? असा प्रश्न उपस्थित होतो. तसेच उद्धव ठाकरे यांचं पात्र असणार की वगळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
      धर्मवीर 2' सिनेमा दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे  निभावणार आहेत. अभिनेता प्रसाद ओक  शिंदे साहेबांची भूमिका साकारणार असून अन्य कलाकरांची नावे मात्र गुलदसत्यात ठेवण्यात आली आहे.  एकंदरीतच 'धर्मवीर' सिनेमात कलाकारांची निवड, लेखन-दिग्दर्शन, अभिनय, संगीतासह सर्वच गोष्टी उत्तमप्रकारे जुळून आल्या होत्या. त्यामुळेच आता 'धर्मवीर 2'मध्येही त्याची पुनरावृत्ती होईल यात शंका नाही.


धर्मवीर 2' मध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या उठावाची थरारक कहाणी...?