बातम्या
ॲथेलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भालफेकपटू नीरज चोप्राची दणदणीत कामगिरी
By nisha patil - 8/28/2023 1:43:01 PM
Share This News:
ॲथेलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भालफेकपटू नीरज चोप्राची दणदणीत कामगिरी
जागतिक भालाफेक स्पर्धेत भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्रा याने दणदणीत कामगिरी केली नीरजने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून एक नवा इतिहास रचला आहे.हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात सुरू असलेल्या अॅथेलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२३ च्या शेवटच्या दिवशी आज भारताला भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक मिळवून दिलेय. त्याने 88.17 मीटर लांब भालाफेक करून सुवर्ण कामगिरी केलीय . 2020 साली ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकलेल्या नीरज चोप्राने आज येथे जागतिक स्पर्धेत पुन्हा सुवर्ण कामगिरी करत , क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर भारताचा झेंडा आणखी उंचावलाय . जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा नीरज चोप्रा हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
ॲथेलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भालफेकपटू नीरज चोप्राची दणदणीत कामगिरी
|