बातम्या

तिरुपतीला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला

Time has come for the devotees who went to Tirupati


By nisha patil - 9/15/2023 8:07:28 PM
Share This News:



आंध्रप्रदेशातील भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू:
बेळगाव हादरले
 

तिरुपती  येथे दर्शनाला गेलेल्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. बेळगाव जिल्ह्यातील पाच भाविकांचा आंध्रप्रदेशमधील मथपल्ली येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. ही  दुर्दैवी घटना पहाटे साडे तीनच्या सुमारास घडली आहे. क्रुझर वाहनाने ट्रकला धडक दिल्याने हा अपघात घडल्याची  प्राथमिक माहिती समोर आली आहे.

  क्रुझर वाहनातून सोळा जण तिरुपतीला गेले होते. अपघातात अकरा जण जखमी झाले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील बडची गावातील सोळा जण तिरुपतीला गेले होते. अपघात झाल्याचे कळताच स्थानिकांनी मदत कार्य सुरू करून पोलिसांना कळवले. पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने क्रुझर वाहनातील जखमींना बाहेर काढून तिरुपती येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातात मृत झालेल्या पाच जणांचे मृतदेह तपासणीसाठी पाठवले आहेत. हनुमंत अजुर (52), मनंदा अजुर (46), शोभा अजुर (36), अंबिका अजुर (19) आणि हणमंत जाधव (52) अशी मृतांची नावे आहेत.


तिरुपतीला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला